Advertisement

जवळ्याची भजी, खिम्याचे पॅटीस आणि बरंच काही चाखा सीकेपी खाद्य महोत्सवात

चमचमीत आणि लज्जतदार सीकेपी खाद्यपदार्थांच्या महोत्सवाचा आस्वाद ७, ८ आणि ९ फेब्रुवारी असे तीन दिवस घेऊ शकता.

जवळ्याची भजी, खिम्याचे पॅटीस आणि बरंच काही चाखा सीकेपी खाद्य महोत्सवात
SHARES

भरलेले पापलेट, खिम्याचे पॅटीस, मटण वडे, वालाचे बिरडे, निनावे, तेलपोळी आणि जवळ्याची भजी... अशा एकाहून एक सरस पदार्थांची लज्जत चाखायची संधी ठाण्यातल्या सीकेपी फूड फेस्टिवलनं उपलब्ध करून दिली आहे. तोंडाला पाणी सुटणाऱ्या चमचमीत आणि लज्जतदार सीकेपी खाद्यपदार्थांच्या महोत्सवाचा आस्वाद ७, ८ आणि ९ फेब्रुवारी असे तीन दिवस घेऊ शकता.

महोत्सव कुठे?

सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्टतर्फे आयोजित या फेस्टिवलचे उद्‍घाटन शु‌क्रवारी संध्याकाळी सहा वाजता करण्यात आले. या महोत्सवात खाद्यांतीसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांचा भरगच्च नजराणाही रसिकांसाठी आहे. फॅशन शो, गाणी, गप्पांची मुक्त मैफलही इथं जमणार आहे. शुक्रवारी ७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते रात्री १० तर शनिवार ८ फेब्रुवारी आणि रविवार ९ फेब्रुवारीला सकाळी ११ ते दुपारी ३, संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत या फेस्टिवलचा आनंद घेता येणार आहे.

महोत्सवाची खासियत

सीकेपी व्यावसायिकांच्या उत्पादनांना तसंच ग्राहकोपयोगी वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या महोत्सवामध्ये विशेष स्टॉल्स आहेत. सीकेपी समाज अस्सल मांसाहारी खवय्या म्हणून परिचित आहे. चिंबोरीचे कालवण, सुरमर्इ फ्राय, तळलेले बोंबिल आणि खिम्याचे कानोले ही सीकेपींची खासियत आहे. तर शाकाहारी पदार्थात सीकेपी सुगरणींची मसुरीची आमटी आणि वालाचे बिरडे या पाककृतींची लज्जतही औरच असते. त्यामुळे हा महोत्सव खवय्यांसाठी पर्वणीच आहे


कुठे : सीकेपी हॉल, खारकर आळी, ठाणे

कधी : , ९ आणि १० फेब्रुवारी २०२०

वेळ : शनिनारी आणि रविवारी

सकाळी ११ ते दुपारी ३ आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० हेही वाचा


संबंधित विषय
Advertisement