Advertisement

हॉटेल सेवा शुल्काविरोधात ग्राहक पंचायतीचा ऑनलाइन सर्व्हे


हॉटेल सेवा शुल्काविरोधात ग्राहक पंचायतीचा ऑनलाइन सर्व्हे
SHARES

मुंबई - ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार हॉटेल-रेस्टॉरंटच्या बिलावरील सेवाशुल्क भरण्यास नकार देण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. असे असतानाही हॉटेल-रेस्टॉरंट मालक मात्र सेवाशुल्क जबदरस्तीने भरून घेत आहेत. याची गंभीर दखल घेत मुंबई ग्राहक पंचायतीने याआधी व्हॉटस्अपवरून ग्राहकांकडून बिलासहीत तक्रारी मागवल्या होत्या. त्यानंतर आता ग्राहक पंचायतीने हॉटेल सेवाशुल्कासंदर्भात 'टु पे ऑर नॉट टू पे' नावाने एक ऑनलाईन सर्व्हेक्षण सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वीच या सर्व्हेक्षणाला सुरूवात झाली असून 27 जानेवारीपर्यंत ऑनलाईन सर्व्हेक्षणात ग्राहकांना सहभागी होता येईल अशी माहिती पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली आहे.
सेवाशुल्क म्हणजे काय? ग्राहक व्यवहार मंत्रालयाची हॉटेल-रेस्टॉरंटबाबतची अधिसूचना काय आहे? बिलावरीत सेवाशुल्क नाकारण्याचा तुम्हाला अधिकार आहे हे माहिती आहे का? अशा अनेक प्रश्नांचा समावेश या सर्व्हेक्षणात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा