Advertisement

'या' मॉलमध्ये फूड आऊलेट्सवर ४० टक्क्यांची ऑफर

टोस्ट डे ऑन ट्यूज डे

'या' मॉलमध्ये फूड आऊलेट्सवर ४० टक्क्यांची ऑफर
SHARES

तुमचा मंगळवारी उपवास वगरे असतो का? पण मंगळवारी उपवास करायचा की नाही याचा पुन्हा एकदा विचार करा. कारण या उपवासामुळे तुम्ही एका मोठ्या संधीपासून मुकणार आहात. कांदिवलीच्या मॉलमध्ये तुम्हाला फूड आऊटलेट्समध्ये भारी ऑफर देण्यात आल्या आहेत. या ऑफर्स कळल्या तर मला खात्री आहे एक मंगळवार तर नक्कीच तुम्ही उपवासातून ब्रेक घ्याल.


ट्यूज डे नाही टोस्ट डे

प्रत्येक मंगळवार हा कांदिवलीच्या मॉलमध्ये टोस्ट डे म्हणून साजरा केला जाणार आहे. याअंतर्गत तुम्हाला ठराविक फूड आऊटलेट्समध्ये वेगवेगळ्या पदार्थांवर ऑफर देण्यात आली आहे. दर मंगळवारी जवळपास ४० टक्क्याची सवलत फूड आऊटलेट्समध्ये देण्यात येत आहे.


अशी असेल ऑफर्स

या मॉलमध्ये अनेक फूड कंपन्यांचे आऊटलेट्स आहेत. पण ४० टक्क्यांची सवलत फक्त मोजक्या आऊटलेट्समध्ये आहे. कुठल्या आऊटलेट्समध्ये काय ऑफर याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कॅफे बॉलिवूड 

व्हेजिटेबल्सनी भरलेला स्प्रिंग रोल सेजवान सॉसमध्ये टोस्ट केला जातो. सेजवान सॉसमध्ये टोस्ट केल्यामुळे थोडा स्पायसी असेल. त्यामुळे तुम्हाला खायला नक्कीच मजा येईल. स्प्रिंग रोलसाठी तुम्हाला ११४ रुपये मोजावे लागतील. याशिवाय पावभाजीवर देखील तुम्हाला ऑफर मिळेल. १५० रुपयाची पावभाजी मंगळवारी तुम्हाला ९० रुपयात मिळेल.

संस्क्रिती

दुपारी किंवा रात्री तुमचा बाहेर जेवणाचा प्लॅन असेल तर या मॉलमधील संस्क्रिती या आऊटलेटमधली थाळी ट्राय करू शकता. चपाती, भाजी, भात-डाळ, एक गोड पदार्थ अशी पोटपूजा करू शकता. मंगळवार सोडला तर बाकी दिवशी यासाठी तुम्हाला ३५० रुपये मोजावे लागतील. पण टोस्ट डे निमित्त दर मंगळवारी तुम्हाला फक्त १८० रुपयात संस्क्रिती इथली थाळी ट्राय करता येईल.

इटालिया

तुम्हाला पास्ता खायचा असेल तर इटालिया फुड आऊटलेट हा उत्तम पर्याय आहे. इथं तुम्हाला इटालियन पदार्थांचा आस्वाद घेता येईल. जर तुम्हाला चीझ खायला आवडत असेल तर इथला चिजी पास्ता तर तुम्ही नक्कीच ट्राय करा. चिजी पास्ता इथं २७२ रुपयाला मिळतो. पण मंगळवारी यासाठी तुम्हाला एकासाठी १६३ रुपये मोजावे लागतील.

ऑनली पराठा

ऑनली पराठा या आटलेटमध्ये तुम्हाला आंबट गोड आणि तिखट अशी राज कचोरी ट्राय करू शकता. रोज १७५ रुपयाला मिळणारी राज कचोरी मंगळवारी १०५ ला मिळेल.

मारुश

शोरमा खाण्यासाठी मारुश बेस्ट आहे. ऑफर अंतर्गत १७३ रुपयांचा शोरमा तुम्हाला १०४  ला मिळेल.

कॅलाश प्रभात

छोले-भटुरू खाण्यासाठी मॉलमधील कॅलाश प्रभात या आऊटलेटला भेट द्या. भले मोठे भटुरे आणि सोबतीला छोले... आहा! यासाठी तुम्हाला २३० रुपये नाही तर फक्त १४२ रुपये मोजावे लागतील.

शेक्स अॅण्ड मोअर

एवढं तिखट खाल्ल्यानंतर आता काही तरी गोड खावं देखील वाटत असेल. मग त्यातही तुम्हाला अनेक पर्याय आहेत. शेक्स अॅण्ड मोअर या आऊटलेटमध्ये क्लासिक चॉकलेट मिल्कशेकसाठी तुम्हाला फक्त ६६ रुपये मोजावे लागतील. इतर वेळी त्यासाठी ११० रुपये आकारले जातात.

मला खात्री आहे ही लिस्ट ऐकून तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलं असेल. आता अजिबात वाट पाहू नका आणि कांदिवलीच्या ग्रोवर्स १०१ मॉलला भेट द्या. शॉपिंगसोबतच तुमचं खाणं-पिणं देखील कमी खर्चात होऊन जाईल.

कुठे : ग्रोवर्स १०१, कांदिवली

कधी : दर मंगळवारी



'या' ठिकाणी घ्या बेस्ट फाइव्ह वॉफल्सचा आस्वाद




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा