• अंधेरीत कोकण महोत्सव
  • अंधेरीत कोकण महोत्सव
  • अंधेरीत कोकण महोत्सव
  • अंधेरीत कोकण महोत्सव
SHARE

अंधेरी - कोकण रत्न प्रतिष्ठानतर्फे अंधेरी पंपहाऊस येथील दिनद्याळ उपाध्यय मैदानात १८नोव्हेंबर पासून कोकण महोत्सवाला सुरूवात झाली आहे. आठवडाभर हा कोकणी महोत्सव चालु असणार आहे. कोकण दर्शन, दशावतारी नाटक, मालवणी फुल टू धमाल आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल  या महोत्सवात असणार आहे. चवदार कोकणी,मालवणी भाजणीचे तळलेले मासे आणि सागरी खाद्यपदार्थांची लज्जतदार मेजवानी, सोलकडी अशा कोकणी पदार्थांची चव खवय्यांना इथे चाखता येणार आहे. तसेच इतर जिवनावश्यक वस्तुंची देखिल दुकाने येथे उपलब्ध आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने महोत्सवास उपस्थित रहावं असे आवाहन भाजपचे उत्तर-पश्चिम जिल्हा सरचिटणिस संतोष मेढेकर यांनी केले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या