Advertisement

मुंबईच्या समुद्रकिनारी गोव्याचा फिल


मुंबईच्या समुद्रकिनारी गोव्याचा फिल
SHARES

तुम्हाला जर मुंबईतच गोव्यासारखी मजा लुटता आली तर? गोव्याची मजा आणि तेही मुंबईत? कसं शक्य आहे? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण आम्ही तुम्हाला मुंबईतच वसलेल्या अशाच एका गोव्याची ओळख करून देणार आहोत. मिरा-भाईंदरच्या उत्तन इथल्या व्हर्जिन बीचवरील सिरीन कॅफेमध्ये तुम्हाला गोव्यासारखाच फिल येईल. भारतीय आणि मोरॉक्कन फ्युजन ऑर्किटेक्चरमुळे तुम्हाला गोव्याच्याच एका कॅफेत आल्याचा फिल येईल.



मुंबईत स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारा पाहण्याची संधी तशी क्वचितच मिळते. पण मुंबईतील या समुद्र किनाऱ्याची बातच काही और आहे. अशा स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारी कॅफे सिरीन वसलेला आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबतकुटुंबियांसोबत किंवा मित्र-मैत्रिणींसोबत या कॅफेत वेळ घालवू शकता.



समुद्रकिनारी सुरू करण्यात आलेल्या या ओपन कॅफेचं आर्किटेक्चर आकर्षक आहे. कॅनपिज, बिनबॅग्स आणि ऑर्नामेंटल चेअर्स यामुळे गोव्याचा फिल तुम्हाला येईल. या कॅफेत डिजे नाईट, बॉलिवूड पार्टी आणि अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.     



तुम्हालासुद्धा समुद्र किनारी एखादी संध्याकाळा घालवायची, असेल तर नक्की कॅफे सिरीनला भेट द्या



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा