Advertisement

मुंबईत पुन्हा आलं तरंगतं हॉटेल!

वांद्रे इथं हे फ्लोटिंग रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत सुरू करण्यात आलेलं हे दुसरं फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे. निळ्याभोर समुद्रात आणि शांत अशा वातावरणात तुम्ही स्वादिष्ट अशा भोजनाचा आनंद घेऊ शकता. वेगवेगळ्या डिशेस, बसण्याची उत्तम व्यवस्था आणि उत्कृष्ट असे संगीत ही इथली खासियत. आर्क डेक रेस्टॉरंट समुद्र किनाऱ्यापासून १.५ किलोमीटर लांब आहे.

मुंबईत पुन्हा आलं तरंगतं हॉटेल!
SHARES

चहूबाजूंनी निळाभोर समुद्र, खवळणाऱ्या लाटा, सुसाट वारा आणि शांत वातावरणात सागरी सफरीला जाण्याची मजा काही औरच! समुद्रातच निसर्ग शोधणाऱ्यांना अशा वातावरणात काही क्षण घालवायला का नाही आवडणार? हेच लक्षात घेऊन मुंबईच्या समुद्रातच एक रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे. आणि म्हणून हे रेस्टॉरंट इतर रेस्टॉरंटपेक्षा हटके आहे!



समुद्रात वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायची मजा तुम्हाला इथे अनुभवता येणार आहे.


आर्क डेकची खासियत 

वांद्रे इथं हे फ्लोटिंग रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे. मुंबईत सुरू करण्यात आलेलं हे दुसरं फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे. निळ्याभोर समुद्रात आणि शांत अशा वातावरणात तुम्ही स्वादिष्ट अशा भोजनाचा आनंद घेऊ शकता. वेगवेगळ्या डिशेस, बसण्याची उत्तम व्यवस्था आणि उत्कृष्ट असे संगीत ही इथली खासियत. आर्क डेक रेस्टॉरंट समुद्र किनाऱ्यापासून १.५ किलोमीटर लांब आहे. त्यामुळे समुद्रातून मुंबईचा नजारा पाहण्यासारखा आहे. कायम धावणारी मुंबई समुद्रातून मात्र वेगळीच जाणवते. याशिवाय तुम्ही भाग्यशाली असाल, तर तुम्हाला डॉल्फिन पाहण्याची संधी देखील मिळेल!



आर्क डेक रेस्टॉरंटचे तीन वेगवेगळे टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे सीट डाऊन रेस्टॉरंट ज्यामध्ये तुम्ही मस्त बसून समुद्रसफर करू शकता. दुसरा टप्पा डेक बार यात तुमची बसण्याची सोय नसते. तुम्ही फक्त उभं राहून मजा, मस्ती करू शकता. तर तिसरा टप्पा आहे प्रायव्हेट डायनिंग. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत डेटवर देखील येऊ शकता. काही दिवसांनी इथं राहण्यासाठी आलिशान रुम्स देखील उपलब्ध होणार आहेत.


खाण्यामध्ये हटके व्हरायटिझ

युरोपियन आणि भारतीय पदार्थांचे फ्यूजन तुम्हाला इथं टेस्ट करायला मिळेल. क्लासिक मशरुम, चिकन पेस्टो, फ्रेंच फ्राईज अशा हटके डिशेसचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता.


आर्क डेक रेस्टॉरंटमध्ये कसे पोहोचाल?

आर्क डेक रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी तुम्हाला वांद्रे सी लिंकला जावं लागेल. जिथून तुम्हाला स्पीड बोटनं आर्क डेक रेस्टॉरंटमध्ये पोहोचवलं जाईल. पण यासाठी तुम्हाला बुकिंग करावी लागेल. यासाठी तुम्ही ARK Deck Bar च्या फेसबुक पेजलाही भेट देऊ शकता.



हेही वाचा

मुंबईकरांसाठी तरंगतं हॉटेल सज्ज


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा