आता मेकडॉनल्डसुद्धा होणार आरोग्यदायी

आता तुम्ही मेकडॉनल्डमधले तुमचे आवडीचे पदार्थ बिनधास्त खाऊ शकता. कारण मेकडॉनल्डनं कस्टमरच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या मेन्यूमध्ये बदल केला आहे. मेकडॉनल्डनं याची घोषणा त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर केली आहे.

आता मेकडॉनल्डसुद्धा होणार आरोग्यदायी
SHARES

चल ना, मेकडॉनल्डचा बर्गर खाऊया....

मेकडॉनल्डचा बर्गर??? अजिबात नाही. त्या बर्गरमध्ये किती ऑईल असतं माहित आहे का तुला?..

अरे ठीक आहे ना..कधीतरी चालतं...

ते कधीचं बनवलेलं असतं. त्यामुळे मॅकडी वैगरे नकोच...

असं माझ्यासोबतच नाही, तर अनेकांसोबत होतं. खायची इच्छा तर असते. पण आरोग्याचा प्रश्न येताच आपले पाय आपोआप मागे फिरतात. पण आता तुम्ही मेकडॉनल्डमधले तुमचे आवडीचे पदार्थ बिनधास्त खाऊ शकता. कारण मेकडॉनल्डनं कस्टमरच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या मेन्यूमध्ये बदल केला आहे. मेकडॉनल्डनं याची घोषणा त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर केली आहे.

1) मैद्याच्या ऐवजी तृणधान्य वापरलं जाणार..म्हणजेच गहू, बाजरी, ब्राऊन राईस...जे की आरोग्यदायी असणार

) फ्राइजमध्ये असणारं सोडियमचं प्रमाण २० टक्क्यांनी कमी करण्यात येईल

) बर्गरसाठी वापरण्यात येणाऱ्या मेयॉनिजमध्ये तेलाचं प्रमाण ४० टक्क्यांनी कमी करणार

) बर्गरमध्ये जी पॅटी असते, त्यात कुठलेच प्रिझर्व्हेटिव्ह्ज किंवा रंग वापरले जाणार नाहीत. त्यामुळे आता तुम्हाला ताजी पॅटी बनवून दिली जाणार

) बर्गरमध्ये असणाऱ्या पॅटीमध्ये आता २५ टक्के अधिक डाएटरी फायबर असेल

) मेक आलू टिक्कीमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट हे समप्रमाणात असेल. यापूर्वी मेक आलू टिक्कीमध्ये फॅट आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक आणि प्रोटिनचे प्रमाण कमी होते

) कोकफ्लोट आणि आईस्क्रीम हे १०० टक्के दुधापासून बनवण्यात येईल आणि हे ९६ टक्के फॅट फ्री असेल 


मेकडॉनल्डनं त्यांचा मेन्यू बदलताच ट्वीटरवर #McDFoodStory या नावानं ट्रेंड सुरू झाला. अनेकांनी मेकडॉनल्डच्या या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.'सुपर साईज मी'

मॉर्गन स्परलॉक या अमेरिकन डॉक्युमेंटरी फिल्ममेकरनं २००४ साली सुपर साईज मी या नावाची डॉक्युमेंटरी बनवली होती. या डॉक्युमेंटरीत मॉर्गननं स्वत:वर एक महिना प्रयोग केला. यामध्ये एक महिना त्यानं फक्त मेकडॉनल्डच्या पदार्थांचं सेवन केलं. त्या व्यतिरिक्त तो काहीच खायचा नाही. पण यामुळे त्याच्या तब्येतीवर प्रचंड परिणाम झाला. त्याचं वजन तर वाढलंच. याशिवाय कोलेस्ट्रॉल, शुगर आणि अनेक समस्या त्याला झेलाव्या लागल्या.

फास्ट फूड हे आरोग्यासाठी फायदेशीर नाही हे सर्वांनाच माहित आहे. पण फास्ट फुडला हेल्दी तडका दिला, तर ते खाल्ल्यानं कुणाच्याच आरोग्याचं नुकसान होणार नाही. त्यामुळे मेकडॉनल्डनं केलेले बदल हे नक्कीच फायदेशीर ठरतील, यात काही शंका नाही. पण आरोग्याच्या दृष्टीनं यात अजून काही बदल करण्यात आले, तर अधिक सोईस्कर होईल.हेही वाचा

मुंबईतल्या हॉटेलात आलाय लष्करी थाट!

 

संबंधित विषय