Advertisement

तुम्हाला मिशी असेल तर मिळेल फ्री पिझ्झा!


तुम्हाला मिशी असेल तर मिळेल फ्री पिझ्झा!
SHARES

मिशी आणि दाढी वाढवणे हे एकेकाळी गबाळेपणाचे लक्षण मानले जायचे. पण आता ट्रेंड बदलत आहे. त्यामुळे दाढी आणि मिशा हे रुबाबदार व्यक्तिमत्त्वाचे लक्षण मानले जाऊ लागले आहे. आता तर मिशा आणि दाढी वाढवणाऱ्यांसाठी वांद्रे इथल्या 'द प्लेलिस्ट पिझेरीया' या आऊटलेटतर्फे एक खास ऑफर देण्यात आली आहे!


काय आहे ही खास ऑफर?

मिशी असणाऱ्यांना 'द प्लेलिस्ट पिझेरीया'तर्फे फ्री पिझ्झा मिळणार आहे. पण फक्त मिशी असून चालणार नाही, तर तुम्हाला ५൦൦ रुपयांचा खर्च करावा लागणार आहे! ५൦൦ रुपयांच्या खर्चावर तुम्हाला सात इंचाचा एक पिझ्झा फ्री मिळणार आहे. ३൦ नोव्हेंबरपर्यंत ही ऑफर उपलब्ध आहे. 'मुछ नहीं, तो कुछ नहीं' या टॅगलाइनखाली ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. 



ऑफरमागची संकल्पना काय?

नोव्हेंबर महिन्यात 'नो शेव्ह नोव्हेंबर' ही मोहीम राबवली जाते. 'नो शेव्ह नोव्हेंबर' या मोहिमेत पुरुषांचे आरोग्य आणि खास करून कॅन्सरबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा हेतू आहे. याच कारणास्तव नोव्हेंबर महिन्यात मिशी वाढवण्याचा ट्रेंड जास्त असतो. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी 'द प्लेलिस्ट पिझेरिया'तर्फे ही ऑफर देण्यात आली आहे. 

कधीपर्यंत - ३൦ नोव्हेंबरपर्यंत

कुठे - प्लेलिस्ट पिझेरिया, शॉप नंबर १, ग्लोरिया अपार्टमेंट, माऊंट मेरी जवळ, वांद्रे (पश्चिम)



हेही वाचा

इटालियन पिझ्झाचा आस्वाद घ्यायचा आहे? मग भेट द्या '1441 पिझेरीयाला'


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा