टोकियो टू मुंबई : इथं घ्या जापनीज स्ट्रीट फुडचा आस्वाद

नेहमी भारतीय जेवण खाऊन कंटाळलेल्या मुंबईकरांना कधीतरी वेगळी चव चाखायची इच्छा होते. थोडं खर्चिक असतं. पण एखाद्या विदेशी खाद्यसंस्कृतीची तोंडओळख झाल्याचं समाधान होतं. मग तुमच्यासाठीच मुंबईत सुरू झाली आहे जापनीस 'हराजुकू' नावाची इटरी...

टोकियो टू मुंबई : इथं घ्या जापनीज स्ट्रीट फुडचा आस्वाद
SHARES

लज्जतदार काँटिनेंटल किंवा विदेशी खान्याची चव मुंबईसारख्या शहरात पूर्वी केवळ तारांकित हॉटेलमध्येच चाखायला मिळायची. त्यानंतर मध्यमवर्गाला बाहेरच्या खाण्याची चटक लागल्यावर हे देशोदेशीचं खाणं सार्वत्रिक झालं. हल्ली तर एखाद्या गल्लीबोळातही थाई नाही तर जपानी रेस्टॉरंट दिसू शकतं. नेहमी भारतीय जेवण खाऊन कंटाळलेल्या मुंबईकरांना कधीतरी वेगळी चव चाखायची इच्छा होते. तेव्हा खिशाला थोडी फोडणी पडते. पण एखाद्या विदेशी खाद्यसंस्कृतीची तोंडओळख झाल्याचं समाधान तरी मिळतं. अाता तुमच्यासाठीच आणखी एक जपानी इटरी वांद्रेमध्ये ओपन झाली आहे.


'हराजुकू' असं या इटरीचं नाव आहे. टोकियो इथं हराजुकू ही जागा स्ट्रीट फुडसाठी प्रसिद्ध आहे. आता या स्ट्रीट फुडची मजा तुम्हाला मुंबईतल्या त्यांच्या इटरीमध्ये घेता येणार आहे. यावरूनच मुंबईतल्या या इटरीचं नाव 'हराजुकू' ठेवण्यात आलं आहे.जापनीज फुडची मेजवानी

'हराजुकू' इटरीमध्ये दोन्ही प्रकारच्या म्हणजेच गोड आणि चटपटीत जापनीज स्ट्रीट फुडचा आस्वाद घेता येईल. त्यांच्या मेन्यूमध्ये गोड आणि चटपटीत असे क्रॅप, डोरायाकी, थाययाकी असे जापनीज गोड पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. थाययाकी हे वॉफलचं जापनीज वर्जन आहे असं म्हटलं तरी चालेल. फिशच्या शेपमध्ये असलेल्या कोनमध्ये चॉकलेट, आईस्क्रीम आणि अनेक प्रकार स्टफ केलेले असतात. चटपटीत पदार्थांमध्ये माचा क्रॅप्स, माचा अॅफेगाटो हे पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता.


जापनीज संस्कृतीवर आधारित

लहान जागेत जरी ही इटरी सुरू करण्यात आली असली तरी एकावेळी ९-१० जण राहू शकतात. इथलं इंटिरियर पाहण्यासारखं आहे. इथल्या भिंतींवर कलरफुल डुडल्स पहायला मिळतील. याशिवाय भिंतींवर चित्रांद्वारे जापनीज संस्कृती मांडण्यात आली आहे. तसंच मोठ्या अक्षरात निऑन साईनमध्ये इट्स हराजुकू असं लिहण्यात आलं आहे.तुम्हाला सुद्धा जापनीज स्ट्रीट फुडचा आनंद घ्यायचा असेल तर या इटरीला भेट देऊ शकता. भन्नाट आणि हटके पदार्थ तुम्हाला चाखायला मिळतील.


कुठे : शॉप ५, डायमंड अर्च बिल्डिंग, चॅपल रोड, वांद्रे (प.)हेही वाचा

'या' पाच ठिकाणी घ्या हॉट चॉकलेटचा आस्वाद

'या' रेस्टॉरंटमध्ये घ्या ९ प्रकारच्या पास्तांचा आस्वाद
संबंधित विषय