Advertisement

'या' रेस्टॉरंटमध्ये घ्या ९ प्रकारच्या पास्तांचा आस्वाद


'या' रेस्टॉरंटमध्ये घ्या ९ प्रकारच्या पास्तांचा आस्वाद
SHARES
Advertisement

इटालियन पास्ता हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ झाला आहे. पास्ता खायचा म्हटलं की आपण एका पायावर तयार होतो. पास्ताची हीच क्रेझ लक्षात घेऊन वांद्रे इथल्या रेस्टॉरंटनं ९ वेगवेगळ्या प्रकारच्या पास्ताचा पर्याय दिला आहे


पास्ताची चव न्यारी

वांद्रे इथल्या चिनचिन या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पास्ता ट्राय करू शकताविशेष म्हणजे हे सर्व पास्ता हँडमेड असणार आहेत. हँडमेड म्हणजे मैद्यापासून इथंच पास्ता बनवला जातो. त्यानंतर त्याला वेगवेगळ्या सॉसेसचा तडका दिला जातो

तुम्ही तिकडे गेलात तर 'स्ट्रॉझाप्रेटी रॅगु दी पोलो', 'प्रॅलापिडेल इन लँब रॅगआऊ', 'टॅगलोनी इन टॉमेटो वोडका सॉस आणि फेटुचिन गॅमबेरी लिमाईन' हे पास्ता नक्की ट्राय करा. तुम्ही इथं पिझ्झाचा देखील आस्वाद घेऊ शकता. इथं वुड फायर ओव्हनमध्ये पिझ्झा बनवला जातो. पिझ्झा कसा बनतो हे तुम्ही त्यांच्या ओपन किचनमध्ये पाहू शकतायाशिवाय त्यांच्याकडे १४ पानांचा ड्रिंक मेन्यू आहे. त्यातील एखाद्या ड्रिंकसोबत इटालियन पदार्थांचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच.

कुठे  : तळ मजला, रहेजा टॉवर्स, बीकेसी, वांद्रे

वेळ : दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंतहेही वाचा

'या' मॉलमध्ये फूड आऊलेट्सवर ४० टक्क्यांची ऑफर
संबंधित विषय
Advertisement