Advertisement

Parle G पॅकेटवरील ‘तो’ फोटो कोणाचा?

Parle G चा इतिहास काय आहे? कुणी सुरू केली कंपनी? पार्ले जी च्या पॅकेटवर फोटो कुणाचा आहे? याचीच उत्तरं जाणून घ्या...

Parle G पॅकेटवरील ‘तो’ फोटो कोणाचा?
SHARES

कोरोना (Coronavirus Update) विषाणूमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे (During Lockdown) अनेक व्यवसायांचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवसाय ठप्प झाल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ आली होती. अशा परिस्थितीत पार्ले जी अनेकांचा आधार ठरला. हेच कारण आहे की, गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वांची भूक भागवणाऱ्या पार्ले-जी बिस्किटांची विक्री मोठ्या संख्येनं वाढली.

आपल्यापैकी अनेक जणांच्या #ParleG सोबत आठवणी जुडलेल्या असतील. पण कधी ना कधी विचार आलाच असेल की, Parle G चा इतिहास काय आहे? कुणी सुरू केली कंपनी? पार्ले जी च्या पॅकेटवर फोटो कुणाचा आहे? असे अनेक प्रश्न पडले असतील किंवा त्यां प्रश्नांना पुन्हा उजाळा मिळाला असेल. आज आम्ही तुम्हाला याच संदर्भात माहिती देणार आहोत.  

Parle G ची सुरुवात

१९२९ मध्ये जेव्हा भारत ब्रिटिशांच्या राजवटीत होता, तेव्हा पारले प्रॉडक्ट नावाची एक छोटी कंपनी अस्तित्वात आली. मुंबईच्या उपनगरात मिठाई आणि टोफी बनवण्यासाठी लहान कारखाना उभारण्यात आला. दशकभरापूर्वी बिस्किटांचं उत्पादन सुरू करण्यात आलं. त्यानंतर, हे भारतातील सर्वात मोठे अन्नधान्य उत्पादक कंपन्यांपैकी एक बनलं. बिस्किटांशिवाय ही कंपनी सॉस, टॉफी असे पदार्थ देखील बनवते. पण बाजारात त्यांची जास्त चलती नाही. पण पार्ले जी बिस्किटांना प्रचंड मागणी आहे.

Parle G नाव कसं ठेवलं?    

'पार्ले जी' हे नाव रेल्वे स्टेशन विलेपार्ले या नावावरून ठेवण्यात आलं. वास्तविक पार्ले-जी मधील 'जी' म्हणजे जीनियस (अलौकिक बुद्धिमत्ता) आणि हे कंपनीचे घोषवाक्य आहे. तर दुसरा अर्थ ग्लुकोज असल्याचं देखील बोललं जातं. कंपनीचा एक संपूर्ण संदेश असा आहे की, जो व्यक्ती पार्ले कंपनीच्या ग्लूकोज बिस्किट खातो तो प्रतिभाशाली, बुद्धिमान होतो.

‘तो’ फोटो कोणाचा?

बिस्कीटच्या पॅकेटवर छापलेल्या मुलाचा फोटो कोणाचा आहे? 'पार्ले जी' बिस्किटांच्या पॅकेटवर छापलेल्या मुलाच्या फोटोबद्दल बर्‍याचदा चर्चा तुमच्या कानावर आल्या असतील. काही दिवसांपूर्वी, हे नीरू देशपांडे यांच्या बालपणाचा फोटो असल्याची चर्चा होती. पण तसं नाही. शिवाय कुठल्या मॉडल आणि अभिनेत्रीचा देखील हा फोटो नाही. १९७९ साली हा फोटो अनिमेटेड केला गेला होता.

दरम्यान, Parle G ची मे मध्ये रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे. मार्केट शेअरमध्ये देखील ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीत ९० टक्के वाटा पार्ले जी या लोकप्रिय बिस्किटांचा आहे.

सध्या ट्विटरवर देखील Parle G ट्रेंडमध्ये आहे. अनेक जण त्यांच्या पार्ले जी बद्दलच्या आठवणी शेअर करत आहेत. कुणी त्याच्यावर काही कॉमेडी मिम्स शेअर करत आहेत.



हेही वाचा

लॉकडाऊनमध्ये Parle-G ची रेकॉर्ड ब्रेक विक्री

Parle G ट्रेंडिंगमध्ये, नेटिझन्सनी 'असं' व्यक्त केलं प्रेम

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा