कार्डबोर्ड थीमवर आधारीत अनोखं रेस्टॉरंट

कार्डबोर्डचा वापर फक्त शाळेत हस्तकला विषयात होऊ शकतो किंवा जास्तीत जास्त काय तर त्याची खेळणी बनवता येऊ शकतात, असा तुमचा समज असेल. पण तुमचा हा गैरसमज कार्डबोर्ड रेस्टॉरंटला भेट दिल्यावर दूर होईल.

  • कार्डबोर्ड थीमवर आधारीत अनोखं रेस्टॉरंट
  • कार्डबोर्ड थीमवर आधारीत अनोखं रेस्टॉरंट
  • कार्डबोर्ड थीमवर आधारीत अनोखं रेस्टॉरंट
  • कार्डबोर्ड थीमवर आधारीत अनोखं रेस्टॉरंट
SHARE

वेगवेगळ्या टीमवर आधारित रेस्टॉरंट तुम्ही अनेकदा पाहिली असतील. अॅव्हेंजर सिरीज थीमवर आधारीत 'हाऊस ऑफ थॅनॉस', तुरुंगांच्या थीमवर आधारित 'जेल रेस्टॉरंट', सलमान खानच्या चित्रपटांवर आधारित 'भाईजान' असे एक ना एनेक रेस्टॉरंट सध्या खवय्यांसाठी आकर्षक केंद्रबिंदू ठरत आहेत.

आता यात आणखी एका रेस्टॉरंटची भर पडली आहे ते म्हणजे 'कार्डबोर्ड' रेस्टॉरंटची. सर्वात महत्त्वाचं या रेस्टॉरंटच्या थीमवरूनच याला काडबोर्ड हे नाव पडलं आहे. हो... अगदी बरोबर वाचताय. कार्डबोर्डचा वापर फक्त शाळेत हस्तकला विषयात होऊ शकतो किंवा जास्तीत जास्त काय तर त्याची खेळणी बनवता येऊ शकतात, असा तुमचा समज असेल. पण तुमचा हा गैरसमज कार्डबोर्ड रेस्टॉरंटला भेट दिल्यावर दूर होईल.


कार्डबोर्ड थीम रेस्टॉरंट

वांद्रे बिकेसीमध्ये कार्डबोर्ड नावाचं रेस्टॉरंट सध्या खवय्यांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतंय. स्वादिष्ट जेवणासोबतच त्यांच्या रेस्टॉरंटची थीम तुम्हाला बुचकळ्यात पाडेल. रेस्टॉरंटची थीम ही कार्डबोर्डवर आधारित आहे. कार्डबोर्डचा वापर करून इथल्या खुर्च्या, टेबल, रॅक आणि इतर सामान बनवण्यात आलं आहे. या खुर्च्या आणि टेबल बनवण्यासाठी फक्त एका कार्डबोर्ड शीटचा वापर करण्यात आला नाही.

 

खराब होत नाही

तर यासाठी एकावर एक असे अनेक कार्डबोर्ड वापरण्यात आले आहेत आणि त्यापासून एक जाडसर शीट तयार करण्यात आली आहे. कार्डबोर्डचा वापर करून बनवण्यात आलेल्या सर्व सामानांवर वॅक्स म्हणजे मेणाचा थर लावला जातो. यामुळे पाणी लागून टेबल किंवा खुर्ची खराब होत नाही. नुरू करीम यांनी या रेस्टॉरंटचं इंटिरीयर केलं आहे.


स्पेशल मेन्यू

शेफ यंग धनानी यांच्या देखरेखीखाली इथला पूर्ण मेन्यू तयार करण्यात आला आहे. त्यांच्या थीमसारखीच डिशेसची नावं देखील हटके आहेत. दक्षिणी पद्धतीच्या कढीवर अंडे असा बाबु नावाचा पदार्थ नक्की ट्राय करा. त्यानंतर चॉकलेट आणि गाजरचा वापर करून बनवण्यात आलेला केक आणि कॉफी या पदार्थांचा आस्वाद घ्या. यासोबतच ब्रेड्स, सुप्स, पॅनकेक आणि उपमा यांचा देखील समावेश आहे.

तुम्हाला जर काही नवीन ट्राय करायचं असेल तर नक्की कार्डबोर्ड रेस्टॉरंटला भेट द्या.

कुठे : कार्डबोर्ड कॅफे, अदानी इन्स्पायर, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉमप्लॅक्स, वांद्रे (पू.)
संबंधित विषय
ताज्या बातम्या