Advertisement

International Coffee Day : कॉफी क्रांती! हे प्रकार तुम्ही ट्राय केलेत का?

कालांतरानं कॉफीत बरेच बदल घडत गेले. आम्ही तुम्हाला कॉफिचे असेच काही प्रकार सांगणार आहोत.

International Coffee Day : कॉफी क्रांती! हे प्रकार तुम्ही ट्राय केलेत का?
SHARES

कॉफी या पेयाचे आपल्या आयुष्यात निश्चितच स्थान आहे. फिल्टर कॉफी असो की कॅफे मोका, साऱ्याच प्रकारांनी लोकांच्या मनात जागा केली आहे. दिवसाची सुरुवात कॉफीने करणारेही अनेक जण आहेत. पण कालांतरानं कॉफीत बरेच बदल घडत गेले. आम्ही तुम्हाला कॉफिचे असेच काही प्रकार सांगणार आहोत.

  • एस्प्रेसो  

यालाच ब्लॅक कॉफी असंही म्हणतात. हा कॉफीचा शुद्ध प्रकार मानला जातो. कॉफीचे सगळे प्रकार यापासूनच तयार केले जातात. हा कॉफीचा हार्ड प्रकार म्हणून ओळखला जातो. ही कॉफी पाणी गरम करून त्यात एस्प्रेसो पावडर आणि साखर घालून बनविली जाते.

  • एस्प्रेसो मॅक्कीऑटो

हा एस्प्रेसोचाच एक प्रकार आहे. या कॉफीच्या प्रकारात स्टीम केलेलं दूध घातलं जातं. पण त्यात दूध घालून चव बदलते.

  • कॅपेचिनो

जगभरात प्रत्येक कॉफी चेनमध्ये हा प्रकार नक्की उपलब्ध असतो. कॉफीच्या या प्रकारात एस्प्रेसो कॉफीमध्ये दूध घातलं जातं. नंतर चॉकलेट सीरप आणि चॉकलेट पावडरनं गार्निश केली जाते.

  • कॅफे लाते

या प्रकारात एस्प्रेसो कॉफीमध्ये तिप्पट दूध घातलं जातं. यात दुधाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पांढरा रंग येतो. यात साखरही घालतात.

  • मोचा चिनो

कॅपेचिनो कॉफीत कोको पावडर घालून हा प्रकार तयार करतात. यात व्हिप्ड क्रीमचा वापर करून कॉफीवर गार्निशिंग करतात.

  • अमेरिका नो

जगात ही कॉफी जास्तीत जास्त प्रमाणात प्यायली जाते. या कॉफीच्या प्रकारात एस्प्रेसो कॉफीमध्ये अर्धा कप गरम पाणी, थोडे दूध आणि साखर घालावी लागते.

  • आयरिश कॉफी

हा प्रकार जगातील प्रसिद्ध अशा कॉफीच्या प्रकारात मोडला जातो. हा प्रकार जगातील कॉफीच्या विशिष्ट प्रकारच्या दुकानात मिळतो. ही कॉफी बनविताना यात व्हिस्की एस्प्रेसो आणि साखरेचा वापर केला जातो.

  • इंडियन फिल्टर कॉफी

हा प्रकार दक्षिण भारतात तयार केला जातो. कॉफीच्या सुक्या बिया बारीक करून, त्या गरम पाण्याबरोबर फिल्टर करून, त्यात दूध आणि साखर घालून तयार करतात. कॉफीच्या इतर प्रकारांपेक्षा हा प्रकार थोडा गोड असतो.

  • तुर्की कॉफी

तुर्की कॉफीच्या वाळलेल्या बिया बारीक करून त्याची पावडर करतात. ही पावडर गरम पाण्यात घालून उकळवतात. यामुळे याला वेगळा स्वाद येतो. नंतर ते पाणी आटवतात. उरलेल्या पावडरमध्ये फ्लेवर मिसळवला जातो.

  • व्हाइट कॉफी

हा कॉफीचा प्रसिद्ध प्रकार मलेशियाची देणगी म्हणून ओळखतात. पाम तेलात कॉफीच्या बिया भाजून, नंतर त्यात दूध आणि साखर घालून बनवतात.Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा