भारतात पहिल्यांदाच सुरू होणाऱ्या फिफा अंडर-17 वर्षाखालील मुलांच्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आतापर्यंत तब्बल 20 हजार तिकिटांची विक्री झाली आहे. पहिल्या दिवशीच्या दोन सामन्याची ही कमाई आहे.
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये ही स्पर्धा होणार आहे. स्टेडिअमची क्षमता ही 45 हजार आहे. पण आतापर्यंत 20 हजार तिकिटांची विक्री झालेली आहे. मॅच सुरू होण्यास अजून दहा दिवस बाकी आहेत. पहिल्या दोन मॅचच्या तिकिटांची लवकरच विक्री होईल, अशी अपेक्षा असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.
देशात पहिल्यांदा होणाऱ्या फिफा अंडर-17 विश्वचषक कपसाठी स्टेडिअमचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तेथील बसण्याच्या खुर्च्या देखील बदलण्यात आल्या आहेत. जेणे करून प्रेक्षकांना सामना नीट पाहता येईल. प्रेक्षकांसाठी सर्व सुविधा देखील डी. वाय. पाटील स्टेडिअमकडून करण्यात आल्या आहेत. जुईनगर आणि नेरुळ रेल्वे स्टेशनवरून बस व्यवस्था देखील केली आहे.
हेही वाचा -
मुंबईकरांना फुटबॉलमधील टॉप संघाचे सामने पाहण्याची सुवर्णसंधी