Advertisement

पनवेलमध्ये सोमवारी कोरोनाचे 'इतके' रुग्ण

दिलासादायक म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी पालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.

पनवेलमध्ये सोमवारी कोरोनाचे 'इतके' रुग्ण
SHARES

पनवेल महानगरपालिका हद्दीत सोमवारी कोरोनाचे १५२ नवीन रुग्ण आढळले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ६०२३ वर पोहोचली आहे.

दिलासादायक म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी पालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. येथील एकूण मृतांचा आकडा १४१ आहे. सोमवारी सापडलेल्या नव्या रुग्णांमध्ये पनवेलमधील २४, नवीन पनवेलमधील २१, खांदा काॅलनी ५,  कळंबोलीतील १९, कामोठे ४२, खारघरमधील ३३ आणि तळोजामधील ८ रूग्णांचा समावेश आहे.  

 सोमवारी १२० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे झालेल्या रुग्णांमध्ये पनवेलमधील २०, नवीन पनवेलमधील ४३, कळंबोलीतील ११, कामोठे ६, खारघरमधील ४०  रूग्णांचा समावेश आहे. पनवेल मनपा क्षेत्रात आतापर्यंत ४४४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १२४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



हेही वाचा

मुंबईत आतापर्यंत 'इतके' कोरोना रुग्ण झाले बरे

बोरिवली, कांदिवली, दहिसर, मालाडमध्ये 'इतके' आहेत कोरोना रूग्ण

दादर, माहीमकरांसाठी मोफत कोरोना तपासणी केंद्र



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा