Advertisement

...म्हणून रविशंकर आपल्या पायावर उभा राहिला


...म्हणून रविशंकर आपल्या पायावर उभा राहिला
SHARES

गेल्या 5 वर्षांपासून संधीवाताने त्रस्त असलेला रविशंकर बेनबेन्से (21) अखेर आपल्या पायावर उभा राहू शकतो.

कांदिवलीतील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयात रविशंकर गेल्या काही महिन्यांपासून संधीवाताच्या त्रासावर उपचार घेत होता. त्याचे दोन्ही हिप्स निकामी झाले होते. त्यासाठी शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय डॉक्टरांकडे होता. पण, शस्त्रक्रियेसाठीचा खर्च रविशंकरच्या कुटुंबियांना परवडणारा नव्हता. त्यामुळे डॉक्टरांनी काही सामाजिक संस्थासोबत मिळून त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला. त्याच खर्चातून त्याच्या एका पायाच्या हिपची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण, आता त्याच्या दोन्ही पायांच्या हिप्सची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता रविशंकर दोन्ही पायांवर व्यवस्थित उभा राहू शकतो, चालू शकतो.


जून महिन्यात रविशंकरच्या डाव्या पायाची शस्त्रक्रियाकरण्यात आली होती. दुसऱ्या पायाची शस्त्रक्रिया 3 ऑगस्टला करण्यात आली. 7 सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

फक्त उपचारांसाठी रविशंकरच्या कुटुंबियांने त्याला उत्तरप्रदेशहून मुंबईला आणले होते. पण, शस्त्रक्रियेसाठीचा खर्च अफाट असल्याकारणाने त्यांना ती परवडणारी नव्हती. पण, शताब्दी रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि काही सामाजिक संस्थांनी त्याच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलला. आता तो पूर्णपणे बरा झाला आहे.

साधारणपणे 30 ते 40 वयोगटातील व्यक्तींना अशा शस्त्रक्रियेची गरज भासते. पण, रविशंकरला ही शस्त्रक्रिया वयाच्या 21 व्या वर्षीच करावी लागली.

रविशंकरवर 3 ऑगस्टला दुसऱ्या पायाची शस्त्रक्रिया करण्यात आली. पण, गुरुवारी आम्ही त्याला डिस्चार्ज दिला आहे. तो आता पूर्णपणे बरा आहे.

- डॉ. जयंत चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, शताब्दी रुग्णालय, कांदिवली


हेही वाचा - 

डॉक्टरांच्या मदतीमुळे झाली न परवडणारी ‘हिप’ शस्त्रक्रिया

शस्त्रक्रिया न करता काढले घशातून लॉकेट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा