Advertisement

कल्याण डोंबिवलीत २२१ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे २२१ नवीन रुग्ण आढळले. तर ७ जणांचा मृत्यू झाला.

कल्याण डोंबिवलीत २२१ नवे रुग्ण, ७ जणांचा मृत्यू
SHARES

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे २२१ नवीन रुग्ण आढळले.  तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४८,४९५ झाली आहे. यामध्ये २३६५ रुग्ण उपचार घेत असून ४५,१५३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व ३५, कल्याण प  ७४, डोंबिवली पूर्व ४८, डोंबिवली प ४९, मांडा टिटवाळा ८, मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५१ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ९ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १० रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.हेही वाचा -

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचे पालिका प्रशासनाचं आवाहन

बनावट ओळखपत्राद्वारे रेल्वे प्रवास; सर्वाधिक ओळखपत्र महापालिकेच्या नावानंRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement