Advertisement

२३ वर्षांच्या मुलीने वडिलांना केले यकृत दान


२३ वर्षांच्या मुलीने वडिलांना केले यकृत दान
SHARES

नवी मुंबईतल्या २३ वर्षांच्या पुजाने आपल्या वडिलांना यकृताचं दान करत त्यांना नवं आयुष्य दिलं आहे.  नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयात दोन आठवड्यांपूर्वी ही शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर दोघांनाही रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. आता, त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं तिथल्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

नवी मुंबईचे रहिवासी श्रीराम बीजार्निया (५५) यांना दीर्घकालीन यकृताचा आजार झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी यकृत प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. जिल्हा प्रत्यारोपण समितीकडे नाव नोंदणीनंतर यकृतासाठी बरीच वाट बघावी लागली. त्यांनी मार्च 2017 ला यकृतासाठी नाव नोंदणी केली होती. तोपर्यंत बीजार्निया यांची प्रकृती खालावल्यामुळे २३ वर्षांच्या पूजाने त्यांना यकृतदान करण्याचा निर्णय घेतला.

योग्य दाता मिळण्यासाठी बीजार्निया कुटुंबातील चार मुली, तसेच पत्नीचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पण, मुलगी पूजा हीच योग्य दाता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, हे यकृत प्रत्यारोपण करण्यात आलं.

लिव्हर ट्रान्सप्लान्टेशनचे प्रमुख डॉ. दारीयस एफ मिर्झा आणि लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. विक्रम राऊत यांनीही शस्त्रक्रिया यशस्वीपणे केली. नुकताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



हेही वाचा

भारंभार रक्तदान नको, नियोजन हवं!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा