Advertisement

राज्यात बुधवारी तब्बल २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण

रोज वाढणारी रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. सरकार व प्रशासकीय यंत्रणांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.

राज्यात बुधवारी तब्बल २३ हजार १७९ नवे कोरोना रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. बुधवारी राज्यात २३ हजार १७९ नवीन कोरोना रुग्ण आढळले.  तर ८४ रूग्णांचा मृत्यू झाला. 

आतापर्यंत राज्यात ५३ हजार ८० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ टक्के आहे. बुधवारी ९ हजार १३८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात  एकूण २१,६३,३९१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.२६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात एकूण १,५२,७६०  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर ६  हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

रोज वाढणारी रुग्णसंख्या ही चिंताजनक आहे. सरकार व प्रशासकीय यंत्रणांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. याशिवाय लसीकरणाचा वेग आणखी वाढवणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. 

देशात बुधवारी ३५,८७१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १७२ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १,१४,७४,६०५ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा १,५९,२१६ इतका झाला आहे. 



हेही वाचा -

मुंबईत २३७७ नवे रुग्ण; कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

मुंबईत लॉकडाऊन नाही, कडक निर्बंध लावणार - अस्लम शेख

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा