Advertisement

राज्यात बुधवारी कोरोनाचे ३४५१ नवीन रुग्ण

राज्यात १९,६३,९४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ % झाले आहे.

राज्यात बुधवारी कोरोनाचे ३४५१ नवीन रुग्ण
SHARES

राज्यात बुधवारी ३४५१ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर २४२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २०,५२,२५३ झाली आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ५५८ रुग्ण आढळले आहेत. 

राज्यात १९,६३,९४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७ % झाले आहे. राज्यात सध्या ३५,६३३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात बुधवारी ३० रुग्णांचा मृत्यू झाला. ३० मृत्यूंपैकी १९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २ मृत्यू रत्नागिरी-१ आणि पालघर-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५०% एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५१,०८,६४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,५२,२५३ (१३.५८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,६५,९९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १,८५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.



हेही वाचा -

रेल्वे प्रवाशांसाठी मोबाइल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन यंत्रणा

आधार कार्ड 'या' १५ गोष्टींसाठी सक्तीचं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा