Advertisement

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३७१ रुग्ण

नवी मुंबईत गुरूवारी (२७ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३७१ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत गुरूवारी कोरोनाचे नवीन ३७१ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत गुरूवारी (२७ आॅगस्ट) कोरोनाचे नवीन ३७१ रुग्ण सापडले आहेत. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता २४,५८५ झाली आहे.

गुरूवारी बेलापूर ३९, नेरुळ ७७, वाशी ५१, तुर्भे ४७, कोपरखैरणे ५८, घणसोली ४६, ऐरोली ४२ आणि दिघामध्ये ७ नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात ३३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ४४, नेरुळ ६९, वाशी ३४, तुर्भे १४, कोपरखैरणे ४६, घणसोली ६७, ऐरोली ४९ आणि दिघामधील १६ रुग्ण बरे झाले आहेत.  बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २०६५६ पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ५६४ झाला आहे.

नवी मुंबईत सध्या ३३६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८४ टक्के झाला आहे. नवी मुंबई पालिकेने स्वतंत्र प्रयोगशाळा सुरू केल्यानंतर १ हजार चाचण्यांची क्षमता असलेल्या प्रयोगशाळेत दिवसाला ९७० पर्यंत चाचण्या केल्या जात आहेत.

 १ लाखापेक्षा अधिक नागरिकांच्या प्रतिजन आणि आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील अद्ययावत प्रयोगशाळेबाबत  पनवेल, नागपूरमधून विचारणा करण्यात येत आहे. 



हेही वाचा -

कोरोनामुक्त रुग्णांसाठी 'पोस्ट कोविड ओपीडी' होणार सुरू

नवी मुंबई, कल्याण डोंबिवलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

मिरा-भाईंदरमधील वाढते मृत्यू चिंतेचा विषय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा