Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ३९ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (११ जानेवारी) ३९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी ३९ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत सोमवारी (११ जानेवारी) ३९ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ५२ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच २ मृत्यूंची नोंद झाली असून त्यामध्ये कामोठे आणि कळंबोली येथील प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे. 

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ४,  नवीन पनवेल २, खांदा काॅलनी ५, कळंबोली १, कामोठे १५, खारघर ११,  तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल १, नवीन पनवेल ७,  कळंबोली ११, कामोठे १४, खारघर येथील १९ येथील  रुग्णांचा समावेश आहे. 

दरम्यान, आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २८०४५ कोरोना रूग्णांपैकी २६९९० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ४४१ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

विद्यार्थ्यांसाठी महापालिका करणार २० कोटींच्या मास्कची खरेदी

विनातिकीट प्रवास करणाऱ्या 'इतक्या' प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा