Advertisement

मुंबईतल्या सेव्हन हिल्स रुग्णालयात वर्धातील 'ते' ४५ डॉक्टर रुजू

वर्धा इथून आलेल्या ४५ डॉक्टर्सची टीम मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या स्टाफमध्ये सामील होणार आहे.

मुंबईतल्या सेव्हन हिल्स  रुग्णालयात वर्धातील 'ते' ४५ डॉक्टर रुजू
SHARES

वर्धा इथून आलेल्या ४५ डॉक्टर्सची टीम मंगळवारी मुंबईत दाखल झाली. ही टीम मुंबईतल्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या स्टाफमध्ये सामील होणार आहे. वर्धा इथल्या महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे हे डॉक्टर्स आहेत. त्यांच्यासाठी खास बस नियुक्त करण्यात आली होती. जवळपास ८०० किलोमीटरचे अंतर कापून ही टीम रुग्णांच्या सेवेत दाखल झाली आहे.

विशेष म्हणजे वर्धा हा महाराष्ट्रातील सर्वात कमी बाधित जिल्हा आहे. आतापर्यंत फक्त एक पॉझिटिव्ह रुग्ण वर्धामध्ये आढळला आहे. हे लक्षात घेऊन या प्रदेशातील डॉक्टरांना मुंबईत बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला, असं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

“वर्धा इथल्या ४५ डॉक्टरांची ही टीम सेव्हन हिल्समध्ये १५ दिवस राहिल. सध्या मुंबईत दिवसाला सुमारे ७०० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे. वर्धाची टिम गेल्यानंतर गरज भासल्यास आम्ही मुंबईबाहेरील डॉक्टरांची एक टीम घेऊन येऊ, 'अशी माहिती पालिकेच्या एका सूत्रांनी दिली.

मुंबई बाहेरील डॉक्टर COVID 19 रुग्णांवर उपचार करण्यासाठी आले आहेत असं पहिल्यांदाच झालं आहे. अधिकाऱ्यांनी सूचित केलं की, येत्या आठवड्यात शहरातील रुग्णालयांमधील आरोग्य सेवा कामगारांची क्षमता वाढवण्याची ही रणनीती असू शकते.

वर्धाहून आलेल्या डॉक्टरांपैकी एक डॉ. परीक्षित चोहटकर म्हणाले की, "आम्ही डॉक्टर आहोत आणि साथीच्या आजाराशी लढा देताना आम्ही पुढे असणं गरजेचं आहे."

४५ डॉक्टरांच्या टिमला मुंबईत आणण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर)चे प्रमुख डॉ. टी.पी. लहाने यांनी पुढाकार घेतला. डीन डॉ. नितीन गंगाणे म्हणाले की, "डॉक्टरांनी तातडीनं मुंबईला जाण्याची तयारी दर्शवली. एकदा सेव्हन हिल्स रुग्णालयातील त्यांची ड्युटी संपली की डॉक्टरांच्या या टिमला १५ दिवस क्वारंटाईन केलं जाईल.”

डीएमईआरच्या आदेशानुसार सुमारे १४ हजार डॉक्टरांनी माहिती नोंदविली आहे. यातील बहुतांश डॉक्टर विविध ठिकाणी कार्यरत असून २३०० डॉक्टरांनी पालिकेसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामधील ७०० एमबीबीएस आहेत, तर १६०० तज्ज्ञ डॉक्टर आहेत.



हेही वाचा

... म्हणून अधिक पीपीई किट्स घेणं पालिकेनं थांबवलं

मुलंडमधील 'या' शाळेचं रुग्णालयात रूपांतर, COVID 19 रुग्णांवर होतात उपचार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा