Advertisement

मुंबईत ५१७ पैकी ४६५ कोविड सेंटर बंद

वरळी, प्रभादेवी, लोअर परळ भागांतून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे महालक्ष्मीमधील जम्बो कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईत ५१७ पैकी ४६५ कोविड सेंटर बंद
SHARES

मुंबईत कोरोना आता आटोक्यात नियंत्रणात येत असल्याचं दिसत आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे महापालिकेने सुरू केलेल्या ५१७ पैकी ४६५ कोविड सेंटर बंद करण्यात आली आहेत. सद्या ५२ कोरोना केअर सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार आहेत.

वरळी, प्रभादेवी, लोअर परळ भागांतून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे महालक्ष्मीमधील जम्बो कोरोना सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या जम्बो कोरोना सेंटरमध्ये ९०० बेड्स होते. तसंच २०० ऑक्सिजन बेड्स गंभीर रुग्णांवर उपचारासाठी सज्ज होते. मात्र आता रुग्ण संख्या कमी झाल्याने ९०० बेड बंद करून केवळ गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी २०० ऑक्सिजन बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत.

 मुंबईत सोमवारी कोरोनाचे ४७७ नवे रुग्ण आढळले. तर ७ रुग्णांचा मृत्यू झाला.  मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या २,८७,३०३ वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा १०,९८८ इतका झाला आहे. ५३३ जणांनी कोरोनावर  मात केल्याने मुंबईत आतापर्यंत २,६६,९६५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या ९००८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

कोरोना चाचणी आता ७८० रुपयात

कोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकारकडून गाईडलाईन्स जारी, 'अशी' देणार लस



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा