Advertisement

मुंबईत गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण!


मुंबईत गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण!
SHARES

मुंबईत पावसाळ्यादरम्यान जागोजागी पाणी साचू लागताच विविध आजारही आपलं डोकं वर काढू लागतात. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने मुंबईतील आजारांच्या आकडेवारीसदर्भात नुकताच एक अहवाल सादर केला असून या अहवालानुसार मुंबईत गॅस्ट्राेचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे.


काय आहे आकडेवारी?

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या वर्षी एकूण १०१० जणांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. यांत सुदैवाने एकही रुग्ण दगावला नाही. परंतु मलेरियाच्या ७५२ रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला होता. या वर्षीच्या आकडेवारीनुसार १५ जुलै २०१८ पर्यंत एकूण ५१९ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून कोणीही रुग्ण दगावलेला नाही. त्याचप्रमाणे १९२ जणांना मलेरियाची लागण झाली असून मलेरियाने देखील कोणताही रुग्ण दगावलेला नाही.



लेप्टोने गेला ४ जणांचा जीव

या वर्षी लेप्टोने एकूण ४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे. कुर्ला, गोवंडी, मालाड आणि वरळी परिसरातील ४ जणांचा लेप्टोने बळी घेतला आहे. वरळी येथील १७ वर्षीय मुलाला वरळी सी फेस येथील दूषित पाण्यात चालल्याने लेप्टोची लागण झाली होती. केईएम रुग्णालयात ३ दिवसांच्या उपचारादरम्यान १३ जुलै रोजी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. पद्मजा केसकर यांनी दिली. तर मुंबईतील एका खासगी रुग्णालयातील रुग्णाला लेप्टोची लागण झाली असून त्याचा देखील मृत्यू लेप्टोने झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लेप्टोसह डेंग्यूचे १६, हेपेटायटीसचे ४९, तर कॉलराचे २ रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

मुंबई महापालिकेने झोपडपट्टी परिसराचा आणि ज्या भागात पाणी साचतं अशा विभागाचा आरोग्य सेविकांकडून सर्व्हे करून लेप्टोची लागण होऊ नये म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून १७,१०६ रहिवाशांना ३७५४६ डॉक्सिसायक्लीन कॅप्सूल दिल्या आहेत.



हेही वाचा-

मुंबईत लेप्टोचा चौथा बळी

बी निगेटिव्हवाल्यांनो..... रहा पॉझिटिव्ह !



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा