Advertisement

कल्याण-डोंबिवलीत गुरूवारी आढळले ५२४ नवे रुग्ण

कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ५२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कल्याण-डोंबिवलीत गुरूवारी आढळले ५२४ नवे रुग्ण
SHARES

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गुरूवारी कोरोनाचे ५२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ९ जणांचा मृत्यू झाला आहे. पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५९८ वर गेली आहे.

गुरूवारी ६०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या येथे ६२०८ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत ८१६५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत २२५  जणांचा  मृत्यू झाला आहे. नवीन रूग्णांमध्ये कल्याण पूर्व १०१, कल्याण प. १३४, डोंबिवली पूर्व १४१, डोंबिवली प. १०६, मांडा टिटवाळा ४, मोहना ३३ तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात गुरूवारी कोरोनाचे ८६४१ नवीन रुग्ण सापडले आहेत. तर  ५५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. राज्यात उपचार सुरू असलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.



हेही वाचा -

नवी मुंबईत गुरूवारी २७३ नव्या रुग्णांची नोंद

पोलिसांच्या गटारीवर ‘संक्रात’

KEM रुग्णालयात COVID 19 रुग्णांचे सर्व रेकॉर्ड्स डिजिटल स्वरुपात




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा