Advertisement

कोरोनाचा उद्रेक, राज्यात बुधवारी ५९ हजार ९०७ नवे रुग्ण

राज्यातील कोरोना उद्रेक आता चिंताजनक बनला आहे. राज्यात बुधवारी तब्बल ५९ हजार ९०७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३२२ रुग्णांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे.

कोरोनाचा उद्रेक, राज्यात बुधवारी ५९ हजार ९०७ नवे रुग्ण
SHARES

राज्यातील कोरोना उद्रेक आता चिंताजनक बनला आहे. राज्यात बुधवारी तब्बल ५९ हजार ९०७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३२२ रुग्णांच्या मृतांची नोंद करण्यात आली आहे.  बुधवारी ३० हजार २९६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत २६ लाख १३ हजार ६२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.३६ टक्के आहे. सध्या राज्यात  ५० हजार १५५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

बुधवारी मुंबईत १० हजार ४२८ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर २३ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा ४ लाख ८२ हजार ७६० वर पोहोचला आहे. तर, ६ हजार ७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत मुंबईत ३ लाख ८८ हजार ११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ११ हजार ८५१ रुग्णांनी प्राण गमावला आहे.  सध्या मुंबईत ८१ हजार ८८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

कल्याण -डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातही कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. पालिका क्षेत्रात बुधवारी १ हजार ७८२ नवे रुग्ण सापडले आहेत. सध्या येथे १२ हजार ८७ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत ७५ हजार १६९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी ९८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाण्यात १ हजार ६१९ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ११११ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.  ५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ठाण्यात कोरोनामुळे १ हजार ४२२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर १३ हजार ४८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.



हेही वाचा -

  1. परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांसाठी क्वरंटाईन सक्तीचं

  1. कोरोनाची लक्षणं नसलेल्यांची प्रतिजन चाचणी होणार नाही

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा