Advertisement

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ६१ नवीन कोरोना रुग्ण

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (५ जानेवारी) ६१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी ६१ नवीन कोरोना रुग्ण
SHARES

पनवेल महापालिका हद्दीत मंगळवारी (५ जानेवारी) ६१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ३१ रूग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. तसेच ३ मृत्यूंची नोंद झाली असून त्यामध्ये पनवेल, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश झाली आहे.  

पनवेल महापालिका हद्दीतील आढळलेल्या नवीन रूग्णांमध्ये पनवेलमधील ६,  नवीन पनवेल ३, खांदा काॅलनी ९, कळंबोली १२, कामोठे १७, खारघर येथील १४ रुग्णांचा समावेश आहे. 

बरे झालेल्या रूग्णांमध्ये पनवेलमधील पनवेल २, नवीन पनवेल ११, कळंबोली १, कामोठे ७, खारघर ९, तळोजा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील एकूण २७७२१ कोरोना रूग्णांपैकी २६७६० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून ६०९ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ३५२ ॲक्टीव्ह रूग्ण आहेत. 



हेही वाचा -

लोकलमध्ये लवकरच उपलब्ध होणार वायफाय

मुंबई ड्रोन, पॅराग्लायडर्स, मायक्रो लाईट एअर क्राफ्टवर बंदी



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा