Advertisement

दिलासादायक! मिरा-भाईंदरमध्ये ५ दिवसात 'इतके' रुग्ण बरे

मीरा-भाईंदर शहरात रोज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, या परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे.

दिलासादायक!  मिरा-भाईंदरमध्ये ५ दिवसात 'इतके' रुग्ण बरे
SHARES
Advertisement

मिरा -भाईंदर शहरात रोज कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मात्र, या परिस्थितीत एक दिलासादायक बाब समोर आली आहे. रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णाचं प्रमाणदेखील वाढलं आहे. मिरा -भाईंदरमध्ये आतापर्यंत ६८ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील ५ दिवसात तर  ७२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. या ठिकाणचा रुग्ण दुपट्टीचा वेगही २८ दिवसांवर गेला आहे.

मिरा -भाईंदर शहरात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३ हजारांवर गेली आहे, तर आतापर्यंत १४० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रोज १०० नवे कोरोना रुग्ण या ठिकाणी सापडत आहेत. मात्र, मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी परतत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे.

 मिरा -भाईंदर शहरात टाळेबंदी शिथिल केल्यानंतर रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. मागील १२ दिवसांत १५०० हून अधिक रुग्ण वाढले आहेत.  परंतु गेल्या पाच दिवसांत ७२८ नागरिकांना कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आता ६८ टक्के झालं आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण २७ टक्के आणि बळी रुग्णांचं प्रमाण ५ टक्के आहे. नागरिकांनी कठोरपणे नियमांचे पालन  केल्यास हे प्रमाण लवकरच कमी होईल, अशा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.हेही वाचा -

वसई, विरार, नालासोपाऱ्यात 'असे' आहेत कंटेन्मेंट झोन

अरे वा ! मास्क न घातल्याप्रकरणी सोमवारी एकही गुन्हा नाही

आता दर ५ मिनिटाला लोकल, कर्मचाऱ्यांना दिलासा
संबंधित विषय
Advertisement