Advertisement

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे ८ नवे रुग्ण, मुंबईकरांचीही चिंता वाढली

आजपर्यंत राज्यात एकूण ४० ओमिक्रॉन रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे ८ नवे रुग्ण, मुंबईकरांचीही चिंता वाढली
SHARES

महाराष्ट्रात शुक्रवारी ओमिक्रॉनच्या ८ नव्या रुग्णाची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमिक्रॉनची रुग्णाची संख्या ४० वर पोहचली आहे. आज आढळलेल्या रुग्णांपैकी सहा रुग्ण पुण्यातील आहेत. तर मुंबई आणि कल्याण डोंबिवलीमधील प्रत्येकी एका-एका रुग्णाचा समावेश आहे.

शुक्रवारी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रात आणखी ८ रुग्ण ओमिक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ६ रुग्ण पुणे, एक रुग्ण मुंबई आणि एक रुग्ण कल्याण डोंबिवली इथले आहेत.

आजपर्यंत राज्यात एकूण ४० ओमिक्रॉन रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यामध्ये मुंबईत १४, पिंपरी चिंचवड १०, पुणे ग्रामीण ६, पुणे मनपा २ , कल्याण डोंबिवली २, उस्मानाबाद २, बुलढाणा १, नागपूर १, लातूर १ आणि वसई विरार १ असे रुग्ण आढळले आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत २५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

शुक्रवारी आढळलेल्या सर्व रुग्णाचे वय २९ ते ४५ यादरम्यान आहे. आठ रुग्णापैकी सात जणांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर एका रुग्णाला सौम्य लक्षणं आहेत.

प्राथमिक माहितीनुसार पुणे इथल्या ४ रुग्णांचा दुबई प्रवास, आणि दोन रुग्ण निकटसहवासित आहेत. मुंबई इथल्या एका रुग्णांचा अमेरिका प्रवास आणि कल्याण डोंबिवली इथल्या एका रुग्णांचा नाजेरिया प्रवास आहे.

शुक्रवारी आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णापैकी सहा जणांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. तर दोन जण रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. आज आढळलेल्या आठही रुग्णाचे लसीकरण झालं आहे. या सर्व रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे.हेही वाचा

ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये आढळतात 'ही' लक्षणं

लस ओमिक्रॉन व्हेरिएंटवर किती प्रभावी?, आरोग्य मंत्रालयाची माहिती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा