Advertisement

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण
SHARES

नवी मुंबईत सोमवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा  मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार ०९२ झाली आहे. 

सोमवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १२, नेरुळ २२, वाशी ६, तुर्भे ७, कोपरखैरणे १२, घणसोली ६, ऐरोली १४, दिघा येथील १ रुग्णांचा समावेश आहे. तर १३६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

सोमवारी बेलापूर ३९, नेरुळ १५, वाशी १५, तुर्भे १२, कोपरखैरणे २०, घणसोली १८, ऐरोली ८, दिघातील ९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४६,६९८ झाली आहे. तर मृतांचा आकडा १००० झाला आहे. नवी मुंबईत सध्या १३९४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

दरम्यान, एक हजारांच्यावर गेलेली नवी मुंबई पोलीस दलातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. सप्टेंबरमध्ये ५००हून अधिक असलेली उपचाराधीन रुग्णांची संख्या आता अवघ्या१३ वर आली आहे. तर पोलीस दलातील मृत्यूचे प्रमाण गेले दोन महिने शून्यावर आहे.

आतापर्यंत नवी मुंबई पोलीस दलातील १३४ अधिकारी, ९३१ कर्मचारी व कुटुंबीयांपैकी ६१९ असे १६८४ कोरोनाबाधित झाले होते. यामधील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. सप्टेंबरमध्ये यापैकी ५००हून अधिक जण उपचार घेत होते. त्यानंतर पोलिसांच्या तंदुरुस्त पथकाने घेतलेली काळजी व वैद्यकीय उपचार यामुळे आक्टोबरमध्ये केवळ २६ जण उपचार घेत होते. त्यानंतर ही संख्या आणखी कमी झाली असून आता फक्त १३ जणांवर उपचार सुरू आहे.



हेही वाचा -

११ वीची दुसरी प्रवेश यादी जाहीर

मुंबईतील 'या' भागात पाणीपुरवठा होणार कमी दाबानं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा