Advertisement

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण

नवी मुंबईत बुधवारी (१३ जानेवारी) कोरोनाचे नवीन ८० रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत बुधवारी कोरोनाचे नवीन ८० रुग्ण
SHARES

नवी मुंबईत बुधवारी (१३ जानेवारी) कोरोनाचे नवीन ८० रुग्ण सापडले आहेत. तर १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ५१ हजार ९२१ झाली आहे.

नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर १४, नेरुळ १५, वाशी १३, तुर्भे १०, कोपरखैरणे ९, घणसोली ७, ऐरोली येथील  ८ रुग्णांचा समावेश आहे. तर ४३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर ७, नेरुळ २, वाशी ६, तुर्भे १४, कोपरखैरणे ६,  घणसोली ५, ऐरोली येथील ३  रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९,९८२ झाली आहे. तर मृतांचा आकडा १०७१ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ८६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९६ टक्के झाला आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत डिसेंबर महिन्यात चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात ७२,७७१ चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्यात वाढ करीत डिसेंबर महिन्यात ८०,६२४ चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. हेही वाचा -

सीरम लसीचा साठा वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना, महाराष्ट्राला मिळाले ९ लाख ६३ हजार कोरोना डोसेस

दिलासादायक! मुंबई-मडगाव एक्स्प्रेस ३१ मार्चपर्यंतRead this story in English
संबंधित विषय