Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

कल्याणमध्ये ९७ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा फैलाव प्रचंड वेगाने झाला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने भितीदायक वातावरण तयार झालं आहे.

कल्याणमध्ये ९७ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात
SHARES

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. दिवसेंदिवस कोरोना कहर वाढत असल्याने सगळीकडेच नकारात्मक वातावरण पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर न घाबरता कोरोनावर मात करता येऊ शकते, असा संदेश कल्याणमधील एका आजोबांनी दिला आहे.  

येथील ९७ वर्षांच्या या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.  रामचंद्र नारायण साळुंखे असं या आजोबांचं नाव आहे. कोरोनातून ते बरे होऊन घरी परतले आहेत.  मागील महिन्याभरापासून कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा फैलाव प्रचंड वेगाने झाला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने भितीदायक वातावरण तयार झालं आहे.  

या नकारात्मक परिस्थितीतही रामचंद्र नारायण साळुंखे यांनी कोरोनाला धोबीपछाड दिला आहे. त्यांच्यावर कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील महापालिका आर्ट गॅलरी कोवीड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार आणि त्या उपचारांना त्यांनी खंबीरपणे साथ देत कोरोनावर मात केली. रुग्णांनी घाबरून न जाता धैर्याने कोरोनाचा मुकाबला केल्यास त्याला परतावून लावू शकतो असाच संदेश या आजोबांनी दिला आहे.

त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. मुनीर आलम यांनी सांगितलं की, आजोबा इकडे दाखल झाले त्यावेळी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. आम्ही तातडीने त्यांच्यावर औषधोपचार सुरू केले खरे. मात्र, औषधापेक्षा त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती दाखवून कोरोनावर मात केली.हेही वाचा -

नागरिकांनी गर्दी केल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा- मुख्यमंत्री

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवास

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा