Advertisement

मुंबईतील दानशूर, टाटा मेमोरियल रुग्णालयाला १२० कोटींची जमीन दान

टाटा मेमोरियल रुग्णालय हे कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे भारतातील सर्वात मोठे रुग्णालय आहे.

मुंबईतील दानशूर, टाटा मेमोरियल रुग्णालयाला १२० कोटींची जमीन दान
SHARES

मुंबईतील टाटा रुग्णालयाला जमीन दान करण्यात आली आहे. याची किंमत जवळपास १२० कोटींच्या घरात आहे. सध्याच्या टाटा रुग्णालयापासून अवघ्या ४०० मीटर अंतरावर असलेली ही जमीन एका दानशूर महिलेनं देणगी म्हणून दिली आहे.

टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांची यादी मोठी असते. त्यामुळे अनेकांना वाट पाहत थांबावे लागते. त्यावर उपाय म्हणून मुंबईतील एका दानशूर महिलेनं तिच्या मालकीची अंदाजे १२० कोटी रुपये किंमतीची जमीन टाटा रुग्णालयाला केमोथेरपी केंद्र सुरू करण्यासाठी दिली आहे.

मुंबईतील ६१ वर्षांच्या दीपिका मुंडले यांनी त्यांची वडिलोपार्जित ३० हजार चौरस फुटाची जागा टाटा रुग्णालयाला देणगी म्हणून दिली आहे. तर आणखी १८ दानशूर व्यक्तींनी त्या ठिकाणी केंद्राच्या बांधकामासाठी एकत्रितपणे देणगी दिली आहे. ही रक्कमही जवळपास १८ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे.

मेहेरबाई टाटा यांचे १९३२ मध्ये रक्ताच्या कर्करोगानं निधन झालं. त्यांचे पती दोराबजी टाटा यांना त्यांच्या पत्नीवर उपचार करणाऱ्या रुग्णालयासारखी सुविधा भारतात आणायची होती. दोराबजींच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तराधिकारी नोरोजी सकलटवाला यांनी त्यांचे प्रयत्न पुढे सुरू ठेवले. शेवटी, जेआरडी टाटांच्या पाठिंब्याचा परिणाम म्हणून मुंबईतील कामगार वस्ती असलेल्या परेलच्या मध्यभागी टाटा मेमोरियल हॉस्पिटल या सात मजली इमारतीचे स्वप्न 28 फेब्रुवारी 1941 रोजी साकार झाले.

टाटा मेमोरियल रुग्णालय हे कर्करोगग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे भारतातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. इथे कॅन्सर पीडित रुग्णांची उपचारासाठी मोठी गर्दी होते. टाटा रुग्णालयात भारतातील कर्करोगाच्या जवळपास एक तृतीयांश रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती आहे. इथे प्राथमिक चिकित्सेसाठी आलेल्या ६०% रुग्णांवर मोफत उपचार केले जातात.



हेही वाचा

राज्यात नवीन मेडीकल कॉलेज आणि अतिविशेष उपचार रुग्णालये सुरू होणार

महालक्ष्मी रेसकोर्सवर पालिका पुन्हा उभारणार जम्बो कोविड सेंटर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा