मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या तुलनेत कोरोना रुग्णसंख्या १४७ नं वाढली आहे.
मुंबईत गेल्या २४ तासात ५१४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ६०४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७ लाख १३ हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 15, 2021
15th September, 6:00pm#NaToCorona pic.twitter.com/yOTKgGPB4A
मुंबईत गेल्या २४ तासात चार रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत ४ हजार ६०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १ हजार २७७ दिवसांवर गेला आहे. मुंबईतील सध्या ३७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत अॅक्टिव्ह कंटेनमेंट झोन शुन्य आहेत.
देशात सलग ८०व्या दिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा ५० हजारांहून कमी आला आहे. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २७ हजार १७६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसंच २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३८ हजार ०१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा