Advertisement

कोरोनापासून एकाच डोसमध्ये होणार बचाव, 'या' लसीला केंद्राची मंजुरी

भारतात सध्या कोरोना लशीचे दोन डोस दिले जात आहेत. पण आता लवकरच फक्त एकच डोस घ्यावा लागणार आहे. जाणून घ्या कसा ते...

कोरोनापासून एकाच डोसमध्ये होणार बचाव, 'या' लसीला केंद्राची मंजुरी
SHARES

भारतात सध्या कोरोना लशीचे दोन डोस दिले जात आहेत. पण आता लवकरच फक्त एकच डोस घ्यावा लागणार आहे. स्पुतनिक लाइटला (Sputnik Light) मोदी सरकारनं हिरवा कंदील दिला आहे. भारतात या या लशीचं ट्रायल होणार आहे. या लशीचा एकच डोस (Singal Dose) पुरेसा आहे, असा दावा कंपनीनं केला आहे.

भारतात सध्या रशियाच्या स्तुपनिक V कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरला मंजुरी देण्यात आलेली आहे. स्पुतनिक लाइट ही स्पुतनिक V चं पुढील व्हर्जन आहे, अशी माहिती याआधी रशियानं दिली होती.

भारतात रशियन लस देण्यासाठी हैदराबादमधील डॉ. रेड्डी (Dr. Reddy's) कंपनीनं रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडसोबत (Russian Direct Investment Fund) करार केलेला आहे. स्तुपनिक V नंतर स्पुतनिक लाइटलाही भारतात मंजुरी मिळवण्यासाठी या कंपनीनं केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती.

सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटी (SEC) या लशीच्या ट्रायलला मंजुरी देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने या लशीच्या ट्रायलला मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता या लशीचं भारतात तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल होणार आहे.

जुलैमध्ये या लशीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी मागण्यात आली होती. पण केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइजेशन, CDSCO) तज्ज्ञ समितीने ही मागणी नाकारली होती. भारतात या लशीचं ट्रायल झालं नाही, त्यामुळे याला परवानगी नाही देऊ शकत असं समितीनं सांगितलं होतं. आता या लशीच्या ट्रायलला परवानगी मिळाली आहे.

मॉस्कोतल्या गॅमेलिया इन्स्टिट्यूटनं ही लस तयार केली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार RDIF सांगितलं, सिंगल डोस स्पुतनिक लाइटचं ५ डिसेंबर २०२० ते १५ एप्रिल २०२१ दरम्यान लसीकरण मोहिमेत (Vaccination Drive) ही लस वापरण्यात आली.

लस (Vaccine) दिल्यानंतर २८ दिवसांनी डेटा तपासण्यात आला. त्यावेळी ही लस ७९.४% प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. रशिया, यूएई, घाना आणि इतर देशांमध्ये या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल घेण्यात आलं आहे. यात ७००० लोकांचा समावेश होता.

ही लस कोरोनाविरोधात ७९.४% प्रभावी आहे. काही लशींच्या दोन डोसपेक्षाही प्रभावी या लशीचा एक डोस आहे, असं रशियानं सांगितलं. या लशीच्या एका डोसशी किंमत १० डॉलर्स म्हणजे ७३७ रुपयांपेक्षाही कमी आहे.



हेही वाचा

WHOची कोव्हॅक्सिनला आठवड्याभरात मिळू शकते मंजुरी

पुढील वर्षापर्यंत मास्क घालणं बंधनकारक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा