Advertisement

तिसऱ्या लाटेसाठी बीएमसी सज्ज, मुलांसाठी स्वतंत्र विभाग

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी मुंबई पालिका आणखी ४ जम्बो कोरोना सेंटर्स उभारत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ही जम्बो सेंटर्स उभारण्याचं काम टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

तिसऱ्या लाटेसाठी बीएमसी सज्ज, मुलांसाठी स्वतंत्र विभाग
SHARES

कोरोना (coronavirus) च्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी मुंबई महापालिका (mumbai municipal corporation) सज्ज झाली आहे. विविध रुग्‍णालये (hospitals) व जम्बो सेंटर (jumbo centers) आणि कोरोना काळजी केंद्रे यातील रुग्‍णशय्या (beds) सुसज्ज करुन उपचारांसाठी उपलब्‍ध आहेत. दुसऱ्या लाटेत लहान मुलांना (children) संसर्गाचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष सर्व रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांसह जम्बो सेंटर्समध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत. 

कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेला थोपवण्यासाठी मुंबई पालिका आणखी ४ जम्बो कोरोना सेंटर्स उभारत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ही जम्बो सेंटर्स उभारण्याचं काम टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. त्यात मुलांसाठी स्वतंत्र विभाग असून ते सर्व सुविधांनी सुसज्ज असणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी दिली.  

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने पूर्वतयारी सुरू केली असून कामे अंतिम टप्प्यात आहेत. काकाणी यांनी २२ जून आणि २३ जून अलॉसे दोन दिवस महापालिकेची विविध रुग्णालये आणि जम्बो कोविड सेंटर्सची पाहणी केली. भायखळा, महालक्ष्मी, मालाड, कांजूरमार्ग येथे उभारण्यात येत असलेल्या कोरोना जम्बो सेंटर्सच्या कामाचा काकाणी यांनी आढावा घेतला. त्यातून ५५०० बेड उपलब्ध होणार आहेत.

सध्या जम्बो सेंटर्समधील बेडची एकूण क्षमता १५ हजार ६५६७ इतकी आहे. यातील ७० टक्के बेड हे ऑक्सिजन बेड्स आहेत. प्रत्येक जम्बो कोरोना सेंटर्समध्ये द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू साठवण टाक्या उपलब्ध आहेत. प्राणवायू सिलिंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये हवेतून वैद्यकीय प्राणवायू उत्पादित करणारी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे प्राणवायूची अडचण भासणार नाही, असे काकाणी यांनी सांगितले. काकाणी यांनी मालाडमध्ये एमएमआरडीएमार्फत नव्याने उभारण्यात येणारे कोरोना केअर सेंटर, गोरेगाव कोरोना सेंटर, बीकेसी कोरोना सेंटर, दहिसर कोरोना सेंटर, कांजूरमार्ग कोरोना सेंटर येथे भेट दिली.

पालिकेची रुग्णालये, जम्बो कोरोना सेंटर्स, कोरोना काळजी केंद्र १ आणि २ यामध्ये २ हजार व्हेंटिलेटर्स बेड्स आहेत. जम्बो कोरोना सेंटर्समध्ये कांजूरमार्ग येथे २ हजार २००, मालाड २ हजार २००, शीव १ हजार २००, वरळी रेसकोर्स ४५०, भायखळा येथील रिचर्डसन ॲण्ड क्रूडास ७००, गोरेगाव नेस्को १ हजार ५०० तर वरळी एनएससीआय येथे १०० बेडची क्षमता वाढवण्यात आली आहे.



हेही वाचा -

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

डेक्कन एक्स्प्रेस 'विस्टाडोम'सह २६ जूनपासून पुन्हा धावणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा