Advertisement

क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी महापालिकेचा चमूकडून घरांची तपासणी


क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी महापालिकेचा चमूकडून घरांची तपासणी
SHARES

दिवसेंदिवस क्षयरोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेने मुंबईतील घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान जवळपास 9 लाख नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे काम केले जाणार आहे.

या अभियानांतर्गत क्षयरोगाचा प्रभाव तुलनेने अधिक जाणवलेल्या 70 परिसरांमधील साधारणपणे 1 लाख 92 हजार 154 घरांतील जवळपास 9 लाख व्यक्तींची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीसाठी महापालिकेच्या 327 चमू कार्यरत असणार आहेत.


क्षयरोगाची तपासणी नियमितपणे केली जाते. 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 दरम्यान, 17 लाख, 92 हजार 308 नागरिकांची तपासणी करण्यात आली होती. पण, हा उपक्रम 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबवत आहोत. घरातील एखादी व्यक्ती कामानिमित्त किंवा इतर कारणांसाठी बाहेर असल्यास, ही चमू दिवसातील इतर वेळी भेट देऊन तपासणी करेल.

- डॉ. पद्मजा केसकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी, महापालिका

प्राथमिक तपासणीदरम्यान आढळणाऱ्या संशयित रुग्णांची तपासणी ही त्या परिसराच्या जवळपास असणाऱ्या सरकारी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. तर, क्ष-किरणचाचणी ही निर्धारित करण्यात आलेल्या खासगी क्ष-किरण केंद्रामध्ये मोफत केली जाणार आहे. यासाठी संशयित रुग्णाला विशेष व्हाऊचर देण्यात येणार आहे.


मोफत औषधोपचार

या अभियानात क्षयरोगाची बाधा आढळून आलेल्या रुग्णांना औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत. या अभियानासाठी स्वयंसेवी संस्थांचीही मदत घेण्यात येणार आहे. 


14 दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असणे, 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ ताप किंवा सायंकाळी ताप येणे. खूप प्रमाणात वजन घटणे, थुंकीमधून रक्त येणे आणि अशी बरीच क्षयरोगाची लक्षणे आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरीत महापालिकेच्या किंवा सरकारी रुग्णालयात जाऊन चाचणी करून घ्यावी. ही चाचणी पूर्णपणे मोफत असते.

- डॉ. दक्षा शाह, उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, (क्षयरोग)

ज्यांना क्षयरोगाची बाधा झाली आहे, त्यांनी नियमितपणे सहा महिन्यांचा औषधोपचारांचा कोर्स पूर्ण केला तर, क्षयरोग बरा होऊ शकतो. पण, त्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेल्या पद्धतीनेच औषधोपचार घेणे अत्यंत गरजेचे असल्याचा सल्ला डॉ. शाह यांनी दिला आहे.



हेही वाचा -

'टीबी' घेतोय रोज 18 मुंबईकरांचा जीव

मुंबईबाहेरून येणारे क्षयरुग्ण घटले - महापालिकेचा दावा




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा