Advertisement

महिलांच्या लसीकरणावर भर देणार, आठवड्यातील एक दिवस महिलांसाठी राखीव

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकणाला कमी प्रतिसाद मिळत आहे ही बाब निदर्शनास आली आहे.

महिलांच्या लसीकरणावर भर देणार, आठवड्यातील एक दिवस महिलांसाठी राखीव
SHARES

मुंबईत महिलांच्या लसिकरणावर यापुढे भर देण्यात येणार आहे. कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांचा लसीकणाला कमी प्रतिसाद मिळत आहे ही बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे महिलांचं लसीकरणाचं प्रमाण वाढवं यासाठी मुंबई महापालिका महिला विशेष लसीकरण सत्र सुरू करणार आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रात आठवड्यातील लसीकरणाचा एक दिवस महिलांसाठी राखीव असणार आहे. पुढील दोन आठवडे प्रायोगिक तत्वावर महिलांच्या लसीकरणासाठी दोन दिवसांचा स्पेशल ड्राईव्ह असणार आहे. श्रावण, हरतालिका, गणेशोत्सव या सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांचा लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळाला असल्याचं दिसून आलं आहे.

महिलांची लसीकरणातील टक्केवारी वाढावी याकरिता मुंबई महापालिका प्रयत्न करणार आहे. मुंबईमध्ये ४२.३२ टक्के महिलांचे लसीकरण झाले आहे. मुंबईमध्ये ४७ लाख १३ हजार ५२३ महिलांनी तर ६३ लाख ०७ हजार ४७१ पुरुषांचे लसीकरण झाले आहे. मुंबईमध्ये १३ सप्टेंबरपर्यंत १ हजार १८२ गर्भवती महिलांनी लस घेतली आहे.

अनेक कुटुंबांमध्ये पुरुषांच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं जातं. लस घेतल्यानंतर ताप, अशक्तपणा येईल त्यामुळेही महिलांचं लसीकरण लांबणीवर टाकलं जात आहे. महिलांच्या सुविधेसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये घराजवळच लसीकरण केंद्र उपलब्ध होईल, असा प्रयत्नही मुंबई महापालिका प्रशासनानं केला आहे.

मुंबईत २३ हजार २३९ नागरिकांना लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये दोन्ही डोस घेऊनही ९००० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पहिला डोस घेऊन कोरोना झालेल्यांची संख्या १४ हजार २३९ आहे. लस घेऊनही कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण हे ६० वर्षांवरील व्यक्तींमध्ये सर्वाधिक आहे.


हेही वाचा

मुंबईत २४ तासात आढळले ५१४ कोरोनाबाधित

कोरोनापासून एकाच डोसमध्ये होणार बचाव, 'या' लसीला केंद्राची मंजुरी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा