Advertisement

अॅसिड प्यायल्यामुळे गेलेली वाचा ३ वर्षांनी आली परत!


अॅसिड प्यायल्यामुळे गेलेली वाचा ३ वर्षांनी आली परत!
SHARES

मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलने एका गरीब कुटुंबातील मुलाला आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने त्याचा आवाज परत मिळवून दिला आहे. सिलवासा येथे राहणाऱ्या १९ वर्षीय मनीषने दहावीला नापास झाल्यामुळे २०१५ साली अॅसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्याच्यावर तात्काळ उपचार झाल्यामुळे त्याचा जीव वाचला. पण, त्याची वाचा कायमची गेली.


तपासण्या केल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय

मनीषचे वडील देवूभाई हे रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. एका मोफत वैद्यकीय तपासणी दरम्यान सिलवासा येथील विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये वोक्हार्ट हॉस्पिटलच्या कान नाक आणि घशाच्या तज्ञ डॉ. नीपा वेलीमुट्टम यांची भेट झाली असता त्यांनी आपल्या मुलाची समस्या सांगितली आणि डॉ. निपा यांनी त्यांना मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये आल्यावर मनीषच्या सर्व वैद्यकीय तपासण्या केल्यावर त्याच्यावर शल्यचिकित्सा करण्याचं ठरवलं.

अॅसिडमुळे मनीषच्या श्वसननलिकेला दुखापत झाली होती आणि ती अरुंद बनली होती. त्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी अडथळा येत होता.

डॉ. नीपा वेलीमुट्टम, इएनटी तज्ज्ञ, वोक्हार्ट


श्वासासाठी मानेला छिद्र

सिलवासा येथील डॉक्टरांनी ट्रॅचेओस्टोमी करून श्वसनासाठी त्याच्या मानेला एक छिद्र केलं होतं. या प्रक्रियेमुळे तो श्वास घेऊ शकत होता. पण, तो बोलू शकत नव्हता.


श्वसननलिकेचा खराब भाग काढला

याबाबत वोक्हार्ट हॉस्पिटलचे कर्करोग तज्ञ डॉ. कृतार्थ ठाकूर आणि भूलतज्ञ डॉ. विनीता संगई यांच्याशी वैद्यकीय सल्ला मसलत करून मनीषच्या श्वसनलिकेवर शस्त्रक्रिया करण्याचं ठरवलं. या शस्त्रक्रियेमध्ये त्याच्या श्वसनलिकेचा खराब झालेला भाग काढून तो पूर्ववत जोडण्यात आला. त्यामुळे त्याच्या स्वर नलिकेला ऑक्सिजन मिळाला आणि त्याचा आवाज परत आला.


मनीषच्या समस्येचे निराकरण कदाचित २ वर्षांपूर्वीच झाले असते. पण, सिल्वासा येथे आधुनिक वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे त्याच्या उपचाराला उशीर झाला. पण, मुंबईत आल्यामुळे मनीष बोलू शकला याचा आम्हाला आनंद आहे.

देवूभाई, मनीषचे वडील



हेही वाचा

सोशल मीडिया सोसवेना! ५ कोटी भारतीयांना मानसिक आजार


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा