Advertisement

कल्याण-डोंबिवलीत शिक्षकांसाठी ५ कोरोना चाचणी केंद्रे

राज्यात सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक आहे.

कल्याण-डोंबिवलीत शिक्षकांसाठी ५ कोरोना चाचणी केंद्रे
SHARES

राज्यात सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार आहेत. शाळेत प्रवेश करण्यापूर्वी शिक्षकांनी कोरोना चाचणी करणं बंधनकारक आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणीसाठी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने ५ कोरोना चाचणी केंद्रं सुरू केली आहेत. या केंद्रावर शिक्षकांची मोफत चाचणी करण्यात येणार आहे.

राज्यातल्या संबंधित सर्व शिक्षकांची कोरोना तपासणीसाठी आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांच्या आरटीपीसीआर चीचणीची जबाबदारी स्थानिक प्रशासन अर्थात महापालिका आणि जिल्हा परिषदांवर सोपवण्यात आली आहे. यात शिक्षकांची तपासणी, शाळेचे सॅनिटायझेशन आणि आरोग्य यंत्रणेच्या जबाबदारीचा समावेश असणार आहे. 

या ठिकाणी चाचणी केंद्रे  

- बाई रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण : सकाळी आठ ते संध्याकाळी सहा.

- वसंत व्हॅली करोना सेंटर, खडकपाडा : सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा.

- साई निर्वाणा रेन्टल हाऊस, शहाड : सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा.

- शास्त्रीनगर रुग्णालय, डोंबिवली : सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा.

- विद्या निकेतन शाळा, मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व : सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा.हेही वाचा  -

सर्वसामान्यांसाठी ५०० ते ६०० रुपयात उपलब्ध होणार कोरोनाची लस

टोलच्या दरात सरासरी १० टक्के वाढRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा