Advertisement

दिलासादायक! वरळीचा 70 टक्के भाग डिकन्टेंट, 15 दिवसात नवीन रुग्ण नाही

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. मात्र, अशा परिस्थितीतही एक दिलासा देणारी बातमी आहे.

दिलासादायक! वरळीचा 70 टक्के भाग डिकन्टेंट, 15 दिवसात नवीन रुग्ण नाही
SHARES

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. मात्र, अशा परिस्थितीतही एक दिलासा देणारी बातमी आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेला वरळीचा 70 टक्के भाग डिकन्टेंट करण्यात आला आहे. म्हणजे हा परिसर आता कन्टेंटमेंट झोनच्या बाहेर आला आहे.  वरळी परिसरात मागील काही दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेन डिकन्टेंटचा निर्णय घेतला आहे. येथे मच्छिमारीलाही मर्यादित स्वरुपात पालिकेने परवानगी दिली आहे.

मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वरळी कोळीवाड्यात सापडत असल्याने संपूर्ण वरळी  परिसर सील करण्यात आला होता. त्यानंतर या ठिकाणी पालिकेकडून खास वरळी पॅटर्न राबविण्यात आला होता. त्यामुळे वरळीतील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यात पालिकेला यश आलं.  गेल्या 15 दिवसात वरळीतील 70 टक्के भागात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नाही. त्यामुळे वरळीतील 70 टक्के भाग डिकन्टेंट करण्यात आला आहे. प्रतिबंध क्षेत्राच्या यादीतून हा भाग वगळला जाणार आहे. चार दिवसांपूर्वी पालिकेने वरळीतील जनता कॉलनी आणि जिजामाता नगर हे दोन्ही परिसरांना कंटेन्मेंट झोनमधून शिथिलता दिली होती.

वरळी कोळीवाडा जेट्टीवरुन मच्छिमारीसाठी पाच बोटी सोडण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने परवानगीही दिली आहे. जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त, मच्छिमार असोसिएशनचे प्रतिनिधी आणि पोलीस यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कोळीवाड्यातील मच्छिमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.



हेही वाचा -

पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी स्वत: मुंबईचे पोलिस आयुक्त रस्त्यावर

दारुच्या होम डिलिव्हरीसाठी रेस्टॉरंट मालकांची सरकारला विनंती




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा