Advertisement

रुग्णाचे १ लाख परत करा, महापालिकेचे 'त्या' रुग्णालयाला आदेश

रुग्णांची लुटमार झाल्याचे प्रकार घडले असून, याबाबत तक्रारीही करण्यात आल्या आहेत.

रुग्णाचे १ लाख परत करा, महापालिकेचे 'त्या' रुग्णालयाला आदेश
SHARES

कोरोना व्हायरसच्या चाचण्यांसाठी महापालिकेनं अनेक केंद्र सुरू केली आहेत. कोरोनाची लक्षणं दिसल्यास तातडीनं तपासणी करण्याचं आवाहन महापालिका व राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. त्यानुसार, अनेक जण महापालिकेच्या रुग्णालयात तपासणी करत असून तिथंच उपचार घेत आहेत. परंतु, या ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी लाखो रुपयो मोजावे लागत आहेत. रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात आहेत.

अशा अनेक प्रकरणांमध्ये रुग्णांची लुटमार झाल्याचे प्रकार घडले आहेत, याबाबत तक्रारीही करण्यात आल्या आहेत. अशाच एका तक्रारीची दखल घेत मुंबई महापलिकेनं दक्षिण मुंबईतील एका रुग्णालयाला रुग्णाकडून वसूल करण्यात आलेले  १ लाख रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. त्याशिवाय, बोरिवलीतील एका रुग्णालयाला कुटूंबाकडून रूग्णाचा मृतदेह सोडण्यापूर्वी ४ लाख रुपयांची मागणी केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे.

हेही वाचा - दिव्यांगासाठी राज्यातील पहिले कोविड रूग्णालय नवी मुंबईत

बोरिवलीतील रुग्णालयाप्रकरणी महापालिकेच्या लेखा परीक्षकानं रुग्णालयाच्या नोंदणींची तपासणी केली. त्यावेळी रुग्णाच्या कुटुंबीयांनी आगोदरच ५ लाख भरल्याचं समोर आलं. दरम्यान, अनेक खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची लटमार केली जात आहे. याप्रकरणी महापालिकेनं खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा - लग्नाच्या बेडीत अडकलेल्या दाम्पत्यावर, पोलिसांच्या बेडीत अडकण्याची वेळ

राज्य शासनानं मुंबईतील प्रमुख ३६ खासगी रुग्णालयांची माहिती तपासण्यासाठी ५ आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. राज्य सरकारनं खासगी रुग्णालयांना रुग्णांना जागरूक करण्यासाठी त्यांचे दर जाहीर करण्यास सांगितलं आहे. तसंच, २१ मे पासून शासनाकडून सर्व खाजगी रुग्णालयांना ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

मेट्रोपॉलिस या खासगी प्रयोगशाळेवर कोरोना चाचण्या करण्यास मुंबई महापालिकेनं बंदी आणली आहे. ही बंदी चार आठवड्यांसाठी असणार आहे. मेट्रोपॉलिसकडून कोरोना चाचणीचे अहवाल उशीरा मिळत होते. त्यामुळे महापालिकेने ही कारवाई केली आहे.



हेही वाचा -

महाराष्ट्रात पुन्हा कठोर लाॅकडाऊन? मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, वाचा..

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा