Advertisement

पालघरमध्ये शुक्रवारपासून कडक लॉकडाऊन

कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी पालघर शहर आणि परिसरात पुन्हा कडक लाॅकडाऊन लागू करण्यात येणार आहे.

पालघरमध्ये शुक्रवारपासून कडक लॉकडाऊन
SHARES

कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी पालघर शहर आणि परिसरात पुन्हा कडक लाॅकडाऊन लागू करण्यात येणार आहे. १४ आॅगस्ट ते १८ आॅगस्ट असा पाच दिवसांचा हा लॉकडाऊन असणार आहे. या काळात शहरातील किराणा मालासह सर्व दुकाने आणि भाजीपाला बाजार बंद राहणार आहेत. लॉकडाऊनमधून औषधांची दुकाने, रुग्णालये आणि अत्यावश्क सेवा यांना वगळण्यात आलं आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी काढला आहे

पालघर शहर आणि परिसरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. शिंदे यांनी शुक्रवारपासून शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याच्या निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मात्र, लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा, औषधांची दुकाने, दूध डेअरी यांना वगळले आहे.

पेट्रोल पंपावरही केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच इंधन देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. लॉकडाऊनमध्ये शहरातील बँकाही सुरू राहणार आहेत. पण त्या टोकन पद्धतीने व्यवहार करतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.हेही वाचाः

Mumbai Rains : मुंबईत बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज, तर 'या' जिल्ह्यांना इशारा

मुंबई लोकलमध्ये चोरीला गेलेलं पाकिट तब्बल १४ वर्षांनी सापडलं
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement