Advertisement

रुग्णालयातील वॉर्डमध्ये CCTV बसवणार, कुटुंबीयांना बघता येईल रुग्णाला

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे रुग्णालयात कसाप्रकारे उपचार केले जात आहेत हे कुटुंबीयांना पाहणं शक्य होणार आहे.

रुग्णालयातील वॉर्डमध्ये CCTV बसवणार, कुटुंबीयांना बघता येईल रुग्णाला
SHARES

कोरोना रुग्णाला हॉस्पीटलमध्ये दाखल केल्यावर त्याला भेटण्यास किंवा पाहायला कुटुंबातील इतर सदस्य येऊ शकत नाहीत. फक्त डॉक्टर्स तपासण्यासाठी येतात. रुग्ण जर क्वारंटाईन केंद्रात किंवा साध्या एखाद्या वॉर्डमध्ये असेल तर त्याचाशी बोलून त्याच्या प्रकतीची विचारपूस करता येते. पण आयसीयूतील रुग्णांचं काय?

रुग्णाची प्रकृती गंभीर असेल तर त्याला आयसीयुमध्ये ठेवावं लागतं. अशा रुग्णांना नाही फोनवर बोलता येतं किंवा व्हिडिओ कॉल करता येतो. पण आयसीयूतील रुग्णांना यापैकी कुठलाच पर्याय नसतो. त्यामुळे रुग्णालयातील वॉर्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं नातेवाईकांना रुग्णांवर लक्ष ठेवता येणार आहे.  

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले की, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना नातेवाईक सीसीटीव्हीमुळे बघू शकतात. यासाठी सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

फक्त नातेवाईकांनाच नाही तर हॉस्पीट स्टाफला देखील त्या रुग्णावर नजर ठेवणं शक्य होईल. 

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. सध्या १० पैकी नऊ रुग्णांना प्लाझ्मा थेरपीचा फायदा होत आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात प्लाझ्मा केंद्रही सुरू करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

तसंच राज्यात कम्युनिटी स्प्रेड नाही. पॉझिटिव्ह रुग्ण घरी संस्थात्मक विलगीकरणात आहेत. त्यामुळे राज्यात कम्युनिटी स्प्रेड झालेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा

बीकेसीच्या कोरोना रुग्णालयातील १ हजार रुग्ण कोरोनामुक्त

दिलासादायक! धारावी ७० टक्के कोरोनामुक्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा