Advertisement

धक्कादायक! रुग्णालयातून मृतदेहच गायब

रविवारी कोरोना चाचणीचा अहवाल आला. यामध्ये मृत व्यक्ती कोरोना नेगेटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यामुळे शेख याचं कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात गेले.

धक्कादायक! रुग्णालयातून मृतदेहच गायब
SHARES

नवी मुंबईतील वाशी येथील पालिका रुग्णालयातून एक मृतदेहच गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मोहम्मद उमर फारुख शेख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. शेख याचा ९ मे रोजी मृत्यू झाला होता. मात्र, कोरोना चाचणीचा अहवाल यायचा असल्याने त्याचा मृतदेह वाशीमधील पालिका रुग्णालयात ठेवण्यात आला होता. 


रविवारी कोरोना चाचणीचा अहवाल आला. यामध्ये मृत व्यक्ती कोरोना नेगेटिव्ह असल्याचं आढळून आलं. त्यामुळे शेख याचं कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यावेळी मोहम्मद उमर फारुख शेख यांचा मृतदेह रुग्णालयातून गायब झाल्याचं उघडकीस आलं. बराच शोध घेऊनही त्यांचा मृतदेह सापडला नाही. त्यामुळे मोहम्मद उमर फारुख शेख यांच्या कुटुंबीयांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. 

दरम्यान नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११९० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. तुर्भे परिसरात सर्वाधिक २३ रुग्ण आढळून आले. तर कोपरखैरणे परिसरात २० नव्या रुग्णांची नोंद झाली. याशिवाय, घणसोली-४, ऐरोली ५, नेरूळ ४, वाशी ४, घणसोली ४  तर बेलापूर आणि दिघ्यात प्रत्येकी एक नवा रुग्ण सापडला आहे. 



हेही वाचा -

अवघ्या एका दिवसात 20 हजार जणांना मद्यविक्रीची घरपोच सेवा... 

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा १४. ५ दिवसांवर




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा