Advertisement

धारावीत आढळले ३० नवे कोरोनाचे रुग्ण

१८ मार्च रोजी धारावीमध्ये कोरोनाव्हायरसचे ३० नवे रुग्ण सापडले. सप्टेंबर २०२० नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे.

धारावीत आढळले ३० नवे कोरोनाचे रुग्ण
SHARES

१८ मार्च रोजी धारावीमध्ये कोरोनाव्हायरसचे ३० नवे रुग्ण सापडले. सप्टेंबर २०२० नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. वृत्तानुसार, जी उत्तर वॉर्डातील झोपडपट्टी-प्रभाग क्षेत्रात गेल्या वर्षी ११ सप्टेंबरला ३३ रुग्ण नोंदवले गेले होते. त्यानंतर आता कोरोनाचा आकडा वाढत आहे.

धारावीमध्ये आतापर्यंत सक्रीय रूग्णांची संख्या १४० वर पोहोचली आहे. २६ फेब्रुवारीपर्यंत धारावीत ५१ सक्रिय प्रकरणं नोंदवली गेली. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दिलेल्या आकडेवारीनुसार,  दादर, धारावी आणि माहीम यांना व्यापणार्‍या जी उत्तर वॉर्डात गुरुवारी १०२ नवीन रुग्ण नोंदवण्यात आली. प्रभागातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६७३ झाली आहेत.

दुसरीकडे, धारावी इथं सोमवार, २२ मार्चपासून स्वतंत्र लसीकरण केंद्र घेण्यात येणार आहेत. दररोज किमान १००० नागरिकांना लसी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, धारावी इथं सुमारे ४५ ते ६० वयोगटातील दीड ते दोन लाख लोक राहतात. त्यांच्या लसीकरणासाठी केंद्रात पाच स्वयंसेवक स्थापन करण्यात येतील. शिवाय, एकाच वेळी पाच जणांना लस दिली जाऊ शकते.

याव्यतिरिक्त, कोरोना नियंत्रित करण्यासाठी चाचण्यांचे आराखडे तयार केले जात आहेत. पालिकेच्या निर्देशानुसार अनेक भागात क्लीन अप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. अलीकडील घडामोडींमध्ये मुंबई पोलिसांनी गस्त घालून नागरिकांना शिस्त लावण्याचं काम हाती घेतलं आहे.

प्रत्येक विभाग प्रतिनिधींच्या मदतीनं स्थानिकांमध्ये जनजागृती करीत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अधिकारी बाजारातल्या गर्दीवर नियंत्रण ठेवत आहेत आणि मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.



हेही वाचा

कोरोना नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, नवी मुंबईत ३१ विशेष दक्षता पथकं कार्यरत

आदेश निघाले.., खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये ५० टक्केच कर्मचारी उपस्थिती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा