Advertisement

धारावीत सापडले कोरोनाचे ५ रुग्ण

सध्या धारावीत १६ कोरोना रुग्ण आहेत. त्यातच १६ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी ५ कोरोना रुग्ण सापडले.

धारावीत सापडले कोरोनाचे ५ रुग्ण
SHARES

धारावीमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्ण सापडत आहेत. सध्या धारावीत १६ कोरोना रुग्ण आहेत. त्यातच १६ फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी ५ कोरोना रुग्ण सापडले. या क्षेत्रातील एकूण सकारात्मक घटनांची संख्या ३ हजार ९८५ इतकी झाली आहे. तर मंगळवारी या भागातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ६५३ वर पोहोचली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिके (BMC)च्या ताज्या आकडेवारीनुसार, माहीममध्ये १०३ सक्रिय प्रकरणं आहेत. तर ४ हजार ६११ रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, माहीम भागातून आणखी ९ कोरोना सकारात्मक रुग्ण सापडले आहेत. त्या भागातील एकूण सकारात्मक घटनांची संख्या ४ हजार ८६८ इतकी झाली आहे.

सध्या जवळच्या दादर भागात ९६ सक्रिय प्रकरणं आहेत. आतापर्यंत ४ हजार ७४७ रुग्ण बरे झाले आहेत. दादरमध्ये आज केवळ तीन प्रकरणं नोंदवली गेली असून एकूण रुग्णांची संख्या ५ हजार ००९ वर गेली आहे.

धारावी, माहीम आणि दादरचा समावेश असलेल्या जी / उत्तर वॉर्डात आज १७ नवीन रुग्ण नोंदवली गेली आहेत. त्यासह प्रभागातील एकूण रुग्ण संख्या १३ हजार ८६२ वर गेली आहे. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत प्रभागात २१५ सक्रियं प्रकरणं आणि १३ हजार ०११ रुग्ण बरे झाले आहेत.



हेही वाचा

राज्यात ७ लाख ४१ हजार ३७० लाभार्थ्यांना कोविड लसीकरण

चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ, प्रभागीय लॉकडाऊन होण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा