Advertisement

डॉक्टरांसाठी राबवणार छळ प्रतिबंधक मोहीम


डॉक्टरांसाठी राबवणार छळ प्रतिबंधक मोहीम
SHARES

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना होणारी मारहाण, महिला डॉक्टरांना सर्रास केली जाणारी शिवीगाळ, अश्लील शेरेबाजी यांसारखे विविध प्रकार थांबवण्यासाठी डॉक्टरांच्या सेंट्रल मार्ड या संघटनेतर्फे छळ प्रतिबंधक मोहीम सुरू करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी छळ प्रतिबंधक विभागही तयार करण्यात आला आहे.



संशोधन अहवाल प्रसिद्ध

अमेरिकेनं एप्रिलमध्ये प्रकाशित केलेल्या एका संशोधन अहवालात आरोग्यसेवा क्षेत्रातील ३० टक्के महिला (डॉक्टर, परिचारिका, सेविका, कर्मचारी) लैंगिक छळ, अश्लील शेरेबाजी आणि शिवीगाळ प्रकरणांना सामोरे जावं लागतं. तसंच नुकतेच कोलकता येथे प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, १३५ पैकी ७७ महिला डॉक्टर, परिचारिका, सेविका, कर्मचाऱ्यांनाही या समस्यांना तोंड द्यावं लागतं.


येथे करता येईल तक्रार

या दोन्ही अहवालानुसार डॉक्टरांच्या मार्ड या मध्यवर्ती संघटनेनं काही खासगी रुग्णालयांतील डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत मुंबईसह इतरत्र ठिकाणी डॉक्टर, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना होणारी मारहाण, लैंगिक छळ, अश्लील शेरेबाजी, शिवीगाळ प्रकरणांची तक्रार या विभागाकडे करता येणार आहे.

राज्यातील रुग्णालय, छोटे दवाखान्यात डॉक्टरांना मारहाण, लैंगिक छळ, अश्लील वर्तवणूक, शिवीगाळ यांसारखे प्रकार घडतात. मात्र अनेक वेळा डॉक्टर घाबरून कोणतंही पाऊल उचलत नाही. त्यामुळे त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा विभाग तयार करण्यात आला आहे. यामुळं डॉक्टरांच्या समस्या, तक्रारी सोडवण्याचा संपूर्ण प्रयत्न करण्यात येणार असून यांसारख्या गोष्टींना कुठेतरी आळा बसेल, अशी आम्हाला खात्री आहे.
- डॉ. लोकेश चिरवाटकर, अध्यक्ष, मार्ड संघटना

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा