Advertisement

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर

मुंबईत आता कोरोनाचा फैलाव आटोक्यात आल्याचं चित्र आहे. मुंबईत रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तर रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला आहे.

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर
SHARES

मुंबईत आता कोरोनाचा फैलाव आटोक्यात आल्याचं चित्र आहे. मुंबईत रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तर रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही वाढला आहे. मुंबईत केवळ १० दिवसांत रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५७ दिवसांनी वाढला आहे. आता मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांवरून १५७ दिवसांवर पोहोचला आहे.

सर्वात जास्त रुग्ण दुपटीचा कालावधी एफ दक्षिण विभागात आहे. एफ दक्षिणमध्ये हा कालावधी ३६२ दिवसांवर पोहोचला आहे. तर बी विभाग २३२ दिवस, जी दक्षिण २३१ दिवस, ए २१२ दिवस असा रुग्ण दुपटीचा कालावधी आहे.  

विभाग                                  रुग्ण दुपटीचा कालावधी

जी उत्तर, ई, एस, एम पूर्व,               १७६ ते १९९ दिवस 

के पूर्व, एफ उत्तर, आर उत्तर,                  

टी,एन,डी, एच पूर्व,एल, पी उत्तर,      १५१ ते १७५ दिवस 

एच पश्चिम,एम पश्चिम,                   

सी, पी दक्षिण, आर मध्य                १२६ ते १५० दिवस   

आर मध्य,  आर दक्षिण के पश्चिम     १०६ ते  १२५ दिवसहेही वाचा -

फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांविरोधात भेंडी बाजारात अनोखे आंदोलन

पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीनं फेटाळला

Read this story in हिंदी
संबंधित विषय